तळसंदे ( वार्ताहर ) तळसंदे येथील डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निकच्या 19 विद्यार्थ्यांची पुणे येथील बजाज ऑटो कंपनीमध्ये निवड झाली आहे. यामध्ये इलेक्ट्रिकल विभागाच्या 9, इलेक्ट्रॉनिक्स टेली कम्युनिकेशनच्या 7 तर मेकॅनिकल विभागाच्या 3 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
बजाज ऑटो ही कंपनी वाहन निर्मिती क्षेत्रातील अग्रेसर कंपनी असून कंपनीच्यावतीने महाविद्यालयात कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 19 विद्यार्थ्यानी आकुर्डी पुणे येथील प्लांटसाठी निवड करण्यात आली. या विद्यार्थ्याना ‘डिप्लोमा ट्रेनी इंजीनिअर’ या पदावर 2 लाख रुपये पॅकेजवर जॉब ऑफर देण्यात आली असल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.अक्षय खामकर यांनी दिली.
यामध्ये इलेक्ट्रिकल विभागाच्या दिव्या पाटील, मधुरा जाधव-पाटील, प्रज्ञा यादव, विनय जाधव, करण पवार, सत्यम माने, आदित्य पाटील विनायक चव्हाण, प्रसाद निगवे इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन विभागातून स्वप्निल मोरे, तुषार पाटील, स्नेहल पाटील, निकिता पाटील, सानिका पांढरबाळे, श्रावणी चव्हाण, शुभम मोहिते मेकॅनिकल विभागातून तेजस गोंगाने, प्रथमेश घाटगे आणि राहुल पोवार यांची निवड करण्यात आली.
बजाज कंपनीमार्फत चंद्रकांत कोरे यांनी मुलाखती घेतल्या. निवड झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. एस. आर. पावसकर यांनी अभिनंदन केले. प्लेसमेंट अधिकारी प्रा.अक्षय खामकर, पॉलिटेक्निकच्या समन्वयिका प्रा. कलिका पाटील, सर्व विभागप्रमुख, रजिस्ट्रार प्रा. पी. एम. भागाजे, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.