पटना ( वृत्तसंस्था ) गेल्या अनेक दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वारसदाराची चर्चा सुरू होती. त्यानंतर आज पीएम मोदींनी यावर भाष्य केले आहे. तुम्हाला सांगतो की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहारच्या महाराजगंजमध्ये एका सभेला संबोधित करत होते. यादरम्यान त्यांनी आपल्या भाषणात मला उत्तराधिकारी नसल्याचे उत्तर दिले. या देशातील जनता माझे उत्तराधिकारी आहे. असं ही म्हटलं आहे.

पीएम मोदी सभेत म्हणाले की, ही भूमी बुद्धिमत्तेची भूमी आहे, येथे देशभक्तीची अखंड गंगा वाहते. एवढी श्रीमंत प्रतिभा असलेली जमीन काँग्रेस आणि आरजेडीच्या खंडणीसाठी ओळखली जात होती. आधी इंडीतील लोकांनी इथून उद्योग आणि व्यवसाय स्थलांतरित केले आणि आता ते बिहारच्या कष्टकरी सहकाऱ्यांचा अपमान करण्यात व्यस्त आहेत. अशी ही टिका केली.

या वेळी मोदी म्हणाले की, लोकांना प्रत्येक गावात जाऊन सांगा की, आम्ही मोदीजींच्या वतीने आलो आहोत. पुन्हा एनडीएचे सरकार आल्यास त्यांना घरे कशी मिळणार ते सांगा. ही घरे घरातील महिला प्रमुखाच्या नावावर असतील. येणारी पाच वर्षे बिहारमध्ये समृद्धी घेऊन येणार आहेत. आमच्या बहिणी आता ड्रोन पायलट होतील आणि त्यांनी ड्रोनने शेती करून पायलट व्हावे, अशी योजना आम्ही आखली आहे. तीन कोटी बहिणींना लखपती दीदी बनवण्याची आमची हमी आहे. असे ही ते म्हणाले.