कुरुंदवाड प्रतिनिधी :- शिरदवाड येथील नंदादीप रिसॉर्ट येथील स्विमिंग येथे पोहण्यासाठी गेले असता कॅरी बॅग मध्ये काढून ठेवलेले दोन मोबाईल चोरट्यांनी लंपास केल्याची फिर्याद सोहेल मोहम्मद शेख वय 19 धंदा शिक्षण (राहणार लोकमान्य नगर कोरोची) यांनी कुरुंदवाड पोलिसात दिली होती. या प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांनी इचलकरंजी येथील दर्शन आण्णाप्पा आंबी ( वय : २८ रा. टाकवडे वेस इचलकरंजी) व गणेश शिवबसाप्पा चौंडेश्वरी ( वय २१, रा . सहकार नगर इचलकरंजी) यांना काही तासातच जेरबंद करून त्यांना न्यायालयात उभे केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

शिरोळ तालुक्यातील शिरदवाड येथे असणाऱ्या नंदादीप रिसॉर्ट येथे स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी फिर्यादी सोहेल शेख व व त्याचे मित्र गेले असता सोहेल शेख व त्याच्या मित्राचा 14 हजार 800 रुपये किंमतीचा रेडमी कंपनीचा निळ्या रंगाचा व 12 हजार 500 रुपयाचा रियलमी कंपनीचा निळ्या रंगाचा मोबाईल एका कॅरीबॅग मध्ये घालून स्विमिंग पुलाच्या बाहेर असलेल्या खुर्चीवर ठेवले होते.

यावेळी दर्शन आण्णाप्पा आंबी व गणेश शिवबसाप्पा चौंडेश्वरी या दोघांनी पाळत ठेवून या ठिकाणी ठेवलेले दोन्ही मोबाईल लंपास केले. फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून कुरुंदवाड पोलिसांत अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून इचलकरंजी येथील दर्शन आण्णाप्पा आंबी ( वय : २८ रा. टाकवडे वेस इचलकरंजी) व गणेश शिवबसाप्पा चौंडेश्वरी ( वय २१, रा . सहकार नगर इचलकरंजी) यांना ताब्यात घेऊन येथील न्यायालयात उभे केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

सदरच्या चोरीचा छडा सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, पोलीस उपनिरीक्षक सागर पवार,सागर खाडे नागेश केरीपाळे, सचिन पुजारी, राजेंद्र पवार यांनी लावला.