मुंबई – गेले कित्येक दिवस एकच चर्चा होती ती म्हणजे राज ठाकरे महायुती सोबत जाणार कि नाही..? जेव्हा राज ठाकरे दिल्लीत जाऊन गृहमंत्री मंत्री अमित शाह याना जाऊन भेट घेतली त्यानंतर या चर्चाना वेग आला होता. ज्या प्रशानाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिले होतं त्या प्रश्नाचे उत्तर मिळालेच. राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मनसैनिकांसाठी मेळावा आयोजित केला होता त्या मेळाव्यात राज ठाकरेंनी महायुतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देत आहे’, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी करत शिवतीर्थावरील गुढीपाडव्या मेळाव्यातून मोठी घोषणा केली. या घोषणेनंतर राज ठाकरेंवर विरोधी पक्ष नेत्यांच्या हल्लाबोल सुरु आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला ते म्हणाले असं काय घडलं की तुम्ही राज्याच्या शत्रूंना पाठिंबा देत आहात, . तुमचा जो ‘नवनिर्माण पक्ष’ आहे त्याचा ‘नमो निर्माण पक्ष’ का झाला ? असा सवाल ही यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे

काय म्हणाले संजय राऊत…?

गेल्या काही काळापासून महाराष्ट्राची अक्षरश: लूट सुरू आहे, खोक्याचं अत्यंत घाणेरडं राजकारण सुरू आहे. त्याचे सूत्रधार नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे आहेत. राज्यातून उद्योग पळवला जातोय, मुंबई तोडण्याचा, मुंबई विकलांग करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा वेळी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निर्माण झालेला जो पक्ष आहे, तोच महाराष्ट्राच्या दुश्मनांना, शत्रूंना पाठिंबा देत असेल तर लोकांच्या मनात शंका उत्पन होतात. त्याचीच उत्तर राज ठाकरे यांना द्यावी लागतील.असं काय घडलं की तुम्ही राज्याच्या शत्रूंना पाठिंबा देत आहात, असा प्रश्न लोकं त्यांना विचारतील. तुमचा जो ‘नवनिर्माण पक्ष’ आहे त्याचा ‘नमो निर्माण पक्ष’ का झाला ? त्याची का गरज पडली ? हे राज ठाकरेंनी सांगितलं पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.