कुरुंदवाड प्रतिनिधी :- शेडशाळ येथील शेतकरी भालचंद्र तकडे यांच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या सावकार चंद्रकांत धनपाल जगताप याला पोलिसांनी कर्नाटकातून जर बंद केले. त्याला आज येथील न्यायालयात उभे केले असता त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

शेडशाळ येथील शेतकरी भालचंद्र तकडे यांना शेडशाळ व कवठेगुलंद येथील पाच सावकारांनी व्याजाने दिलेल्या पैशासाठी तगादा लावल्याने भालचंद्र तकडे यांनी सावकारांच्या त्रासाला कंटाळून आपल्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये अँगल ला गळफास लावून आत्महत्या केली होती. याप्रकरणी पाच संशयित आरोपी पैकी रविकांत जगताप याला पोलिसांनी अटक केली होती.

उर्वरित सावकारांच्या शोधासाठी पोलिसांची पदके रवाना झाली होती. रविवारी रात्रीच्या सुमारास कुरुंदवाड पोलिसांनी कर्नाटक राज्यातून चंद्रकांत धनपाल जगताप याला जेरबंद केले, सोमवारी दुपारी त्यांना येथील न्यायालयात उभे केले असता त्यांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. उर्वरित सावकारांच्या शोधासाठी कुरुंदवाड पोलिसांची पथके रवाना झाली असून लवकरच त्यांना जेरबंद करण्यात येणार असल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सागर पवार यांनी दिली.