कोल्हापूर (प्रतिनिधी) : खेलो इंडियातर्गंत विविध खेळांत यश मिळवलेले खेळाडू काही वेळ खेळाडूंनी खेळाच्या गणवेशात येऊन जिल्हाधिकारी कार्यालय आवारातच सराव केला. वेगवेगळ्या खेळांच्या सरावासाठी मैदाने खुली करावीत, या मागणीसाठी शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीच्या नेतृत्वाखाली अशाप्रकारे प्रतिकात्मक सराव करण्यात आला.
यावेळी प्रशिक्षकही खेळाडूंना धडे देत होते. यामुळे विविध कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आलेले आश्चर्य चकित होऊन पाहत राहिले. प्रतिकात्मक सरावात स्केटींगचे महेश कदम, सुहास कारेकर, क्रिकेटचे शिवाजी कामते, संजय तोरस्कर, जलतरणचे निळकंठ आखाडे, हॉकीचे योगेश देशपांडे, ज्युदोचे शरद पोवार, कुस्तीचे रामा धर्मोदी, बॉक्सिंगचे मंगेश कराळे आदी सहभागी झाले होते.