कळे (प्रतिनिधी) :  पन्हाळा तालुका सरपंच परिषदे दिल्ली येथे चार दिवसांपूर्वी अभ्यास दौऱ्यावर गेले होते. त्यांचा दौरा आज (रविवार) पार पडला. या अभ्यास दौऱ्यात भारत सरकारचे रस्ते परिवहन व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक, केंद्रीय पंचायतराज राज्य मंत्री कपिल पाटील याची भेट घेण्यात आली. या भेटीत विविध विषयांवर चर्चा झाली. या अभ्यास दौऱ्यात पन्हाळा  तालुक्यातील ३३ सरपंचानी सहभाग घेतला होता.

ग्रामपंचायतीचा कारभार चालवत असताना विविध समस्या भेडसावत असतात. त्या सर्व समस्या मांडण्यासाठी या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. १५ वा वित्त आयोग केवळ विकास कामावर खर्च व्हावा यामध्ये महाराष्ट्र शासनाने परस्पर निधी कपात करून घेऊ नये, डेटा एन्ट्री ऑपरेटर नेमण्यासाठी ग्रा.पं.ला अधिकार द्यावेत, कोरोना काळातील नळ पाणीपुरवठा योजनेचे  वीज बिल माफ करावे, घरकुलचे लाभार्थी ऑनलाइन पध्दतीने न निवडता प्रत्यक्ष पाहणी करून योग्य लाभार्थी निवडावेत अशा अनेक मागण्या करण्यात आल्या. या मागण्या सोडवण्यासाठी मंत्री नितीन गडकरी, ना. कपिल पाटील, ना. श्रीपाद नाईक यांनी  सरपंचांना आश्वासन दिले.

या दौऱ्याचे नियोजन सरपंच परिषद राज्य संघटक शिवाजी मोरे,  राज्य महिला संघटक राणिताई पाटील, जिल्हाध्यक्ष सागर माने. तालुकाध्यक्ष अनिष पाटील, राधीका पाटील, शोभाताई पाटील, संदीप पाटील,  दादासाहेब तावडे, सरदार वाळवेकर यांनी केले.