मुंबई – बॉलिवूडची मर्दानी राणी मुखर्जी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती बॉलिवूडमध्ये गेले अनेक वर्षे झाले काम करत आहे. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. हीचकी, मर्दानी, ब्लॅक, तलाश अशा अनेक चित्रपटांमधे तिने वेगवेगळी भूमिका साकारली आहे. ती जेवढी सिनेमांमुळॆ चर्चेत असते, तितकेच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. आता राणी मुखर्जी तिच्या एका वैवाहिक आयुष्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. एका मुलाखतीत राणी हिने मोठं वक्तव्य केलंय

काय म्हणाली राणी..?

मुलाखतीत पती आदित्य यांचं कौतुक करत राणी म्हणाली होती, ‘आदित्य एक उत्तम पुरुष आहे. लोकांचा आदर कसा करायला हवा त्याला माहिती आहे. मी अशा घरात मोठी झाली आहे, जेथे लोकांचा आदर, सन्मान कसा करायचा हे मला शिकवलं आहे. पहिल्यांदा जेव्हा आदित्य याला पाहिलं तेव्हा त्याची वागणूक मला आवडली. टीममध्ये त्याची लिडरशीप पाहून मी आकर्षित झाली…’

‘आदित्य मनाने फार चांगला आहे. पती-पत्नीच्या नात्यात सुरुवातील तुम्ही एकमेकांकडे आकर्षित होता. पण लग्नानंतर प्रेम कमी होतं. पण एकमेकांसाठी मनात असलेला आदर कमी व्हायला नको… आदर आणि सन्मान कमी झाल्यानंतर नात्यात काहीही शिल्लक राहात नाही…’

अभिनेत्री वाईट नात्यांबद्दल म्हणाली . अनेक महिला अशा आहेत, ज्या फक्त लग्न केलं आहे म्हणून आयुष्य जगत आहेत. पण त्या कधीच स्वतःचे विचार मांडू शकत नाहीत. महिलांना अनेक वर्षांनंतर कळतं, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. लग्न एका योग्य कारणासाठी झालं पाहिजे. जर तुम्ही चुकीच्या कारणामुळे लग्न करत असाल तर संपूर्ण आयुष्य खराब होईल… असं देखील अभिनेत्री म्हणाली.