कुरुंदवाड (प्रतिनिधी) : होळीच्या दिवशी मद्यप्राशन करून वाहन चालविणे तसेच हुल्लडबाजी करणाऱ्या १४ दुचाकीस्वारांवर कुरुंदवाड पोलिसांनी कारवाई केली आहे. ड्रिंक अँन्ड ड्राईव्ह या गुन्ह्यांखाली चार तर दहा जणांना दंडात्मक कारवाई केली. यामध्ये १४ दुचाकी जप्त करण्यात आले असून २० हजारांचा दंड वसूल केला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस आणि उपनिरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने ही कारवाई केली. या कारवाईने नियमांचे उल्लंघन करुन वाहन चालविणाऱ्या दुचाकीस्वारांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

तर दत्तवाड येथे दुचाकी वाहनांचे आवाज वाढवून हुल्लडबाजी करणाऱ्या दहा शालेय विद्यार्थ्यांची दुचाकी जप्त करुन त्यांना ताब्यात घेतले. विद्यार्थ्यांच्या पालकांना पोलिस ठाण्यात बोलावून सक्त ताकीद करत आणि दंड वसूल करुन सोडून देण्यात आले.

ही कारवाई सागर खाडे, नागेश केरीपाळे, फारुख जमादार, बाळासो कोळी यांनी केली.