धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ चरण येथे जाहीर सभा

बांबवडे (प्रतिनिधी ) – धैर्यशील माने यांना शाहूवाडी विधानसभेतून मोठे मताधिक्य देऊन निवडून देऊया असे आवाहन आमदार विनय कोरे यांनी शाहुवाडी तालुक्यातील चरण येथील जाहीर सभेमध्ये केले विरोधकांकडून निर्माण केलेल्या भूलथापांना बळी न पडता पूर्णपणे ताकतीने धैर्यशील माने यांचा प्रचार करून धनुष्यबाण चिन्ह घराघरापर्यंत पोचवा असे आवाहन विनय कोरे यांनी केले.

2014 पूर्वीच्या भारत आणि नरेंद्र मोदींच्या कडे नेतृत्व आल्यानंतर जगात भारताची मान उंचावणाऱ्या देशाचे सक्षम नेतृत्व असणाऱ्या नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी धैर्यशील माने यांना निवडून द्या असे सांगून राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात निधी शाहुवाडी तालुक्यासाठी खेचून आणला असल्याचे सांगून भविष्यात तालुक्याचा विकास करण्यासाठी मतदार संघाची जाण असणारा आणि नेमकी गरज ओळखून काम करणारा खासदार निवडून द्यायचा आहे खा. धैर्यशील माने यांनी केवळ दोन वर्षात मतदारसंघातील रस्ते , पाणी पुरवठा योजना , औद्योगीक वसाहती , पंचगंगा प्रदूषण , पूरनियंत्रण यासाठी तब्बल ८२०० कोटींचा निधी केवळ दोन वर्षात खेचून आणला आहे . त्यासाठी राज्य आणि केंद्रशासनाशी समन्वय असणेही महत्वाचे आहे . भविष्यांतही या माध्यमांतून निधी आणून मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी धैर्यशील माने यांना मोठया मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन आमदार विनय कोरे यांनी केले .

हातकणंगले मतदार संघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ शाहूवाडी तालुक्यातील भाडळे ,खुटाळवाडी ,सुपात्रे ,हणमंतवाडी ,वरेवाडी , कुंभारवाडी , खोतवाडी ,केळेवाडी , गमेवाडी ,सावर्डे बु।। , परखंदळे , पेढेवाडी ,मांडलाईवाडी ,तळपवाडी , गुजरवाडी ,शित्तुर तर्फ मलकापूर ,सोनवडे ,पिशवी ,साळशी ,गोगवे ,बजागेवाडी ,भैरेवाडी ,ससेगांव ,मोळवडे ,कोपार्डे ,सांबू ,शिरगांव ,सावर्डे खुर्द सावे ,सवते ,शिंपे ,पाटणे ,वाडीचरण ,डोणोली ,चरण ,सैदापूर ,थेरगांव आदी गावांचा दौरा करून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

यावेळी त्यांच्या सोबत गोकुळ दूध संघाचे संचालक करणसिंह गायकवाड माझी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील बेडेकर विजय देसाई यांच्यासह जनसुराज्य पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते