सोमवारपासून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढणार

नवी दिल्ली : सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसणार आहे. पुढील आठवड्यापासून अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती  वाढणार आहेत. अशा परिस्थितीत, घरगुती वस्तू, हॉटेल, बँक सेवा आणि बरेच काही यावर अधिक खर्च करावा लागणार आहे. दि. १८ जुलैपासून अनेक जीवनावश्यक वस्तू आणि सेवांच्या किमती वाढणार आहेत. चंदीगडमध्ये झालेल्या दोन दिवसीय ४७ व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत केलेल्या… Continue reading सोमवारपासून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढणार

१८ वर्षांवरील नागरिकांना १५ जुलैपासून बूस्टर डोस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना संसर्गाच्या नव्याने वाढ होत असताना सरकारने १८ ते ५९ वयोगटातील लोकांना कोविड लसींचे मोफत डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. १५ जुलैपासून यासाठी विशेष मोहीम सुरू होणार आहे. या ७५ दिवसांच्या मोहिमेअंतर्गत सरकारी लसीकरण केंद्रांवर कोविड लसीचे बूस्टर डोस मोफत दिले जाणार आहेत. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त सरकारने कोविडच्या… Continue reading १८ वर्षांवरील नागरिकांना १५ जुलैपासून बूस्टर डोस

श्रीलंकेत आणीबाणी जाहीर; राष्ट्रपतींचे मालदीवमध्ये पलायन

कोलंबो : आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी देश सोडून मालदीवमध्ये पलायन केले आहे. राजपक्षे यांनी देश सोडल्यानंतर लोक संतप्त झाले आहेत. राजधानी कोलंबोच्या रस्त्यावर आंदोलक गोंधळ घालत आहेत, तर हजारो लोकांचा मोर्चा संसद भवनाकडे कूच करत आहे. जनतेचा तीव्र विरोध पाहता पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी आणीबाणी जाहीर केली आहे. हजारो… Continue reading श्रीलंकेत आणीबाणी जाहीर; राष्ट्रपतींचे मालदीवमध्ये पलायन

नगरपरिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय जाहीर झालेल्या निवडणुका पार पडणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नवीन अधिसूचना न काढण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. आतापर्यंत जाहीर झालेल्या निवडणुकांच्या अधिसूचनेत कोणताही बदल करू नये असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे राज्यातील ९२ नगरपरिषदांच्या निवडणुका वेळेत आणि ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडणार आहेत. मागील अनेक दिवसांपासून… Continue reading नगरपरिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार

केरळमध्ये आरएसएसच्या कार्यालयावर बॉम्बहल्ला

पयन्नूर (वृत्तसंस्था) :  केरळमध्ये आरएसएसच्या कार्यालयावर बॉम्बहल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. केरळमधील कन्नूरच्या पयन्नूरमधील ही घटना आहे. हल्ल्यात इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याची माहिती आहे. हा हल्ला आज (मंगळवारी) सकाळी घडवून आणण्यात आला. केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील पयन्नूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर मंगळवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत… Continue reading केरळमध्ये आरएसएसच्या कार्यालयावर बॉम्बहल्ला

सोनिया गांधी यांना ईडीचे पुन्हा समन्स

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना अंमलबजावणी संचालनालयाने पुन्हा समन्स बजावले आहे. नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्राशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने सोनिया गांधी यांना दि. २१ जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. यापूर्वी सोनिया गांधी यांनी चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहण्यासाठी आणखी काही दिवसांची मुदत मागितली होती. कोरोनाशी लढा देत असलेल्या सोनिया… Continue reading सोनिया गांधी यांना ईडीचे पुन्हा समन्स

शिंदे गटास तूर्त दिलासा, ठाकरेंना झटका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर सरन्यायाधीशांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. नोटीस बजावण्यात आलेल्या शिंदे गटातील १६ आमदारांबरोबर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असलेल्या आमदारांनाही दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने दोन्ही बाजूच्या आमदारांवर निकाल येईपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, असे आदेश दिले आहेत. सत्तांतरानंतर शिवसेना विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट असा राजकीय संघर्ष राज्यात… Continue reading शिंदे गटास तूर्त दिलासा, ठाकरेंना झटका

निवडणुका पुढे ढकलण्याबाबत आयोगाशी चर्चा करणार : मुख्यमंत्री

दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य निवडणूक आयोगाने नुकत्याच राज्यातील नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर केल्या; पण या निवडणुका पुढे ढकलण्याबाबत चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सागितले आहे. सध्या पावसाळा आहे. अडचणी निर्माण होऊ शकतात. पावसाळ्यात मनुष्यबळही जास्त लागेल. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, यावर आयोगाशी चर्चा करणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, ऐन… Continue reading निवडणुका पुढे ढकलण्याबाबत आयोगाशी चर्चा करणार : मुख्यमंत्री

पुढच्या निवडणुकाही आम्हीच जिंकणार : एकनाथ शिंदे

दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य सरकारच्या स्थापनेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे आशीर्वाद आहेत. आमचे सरकार अडीच वर्षे टिकणार आणि पुढच्या निवडणुकाही आम्हीच जिंकणार आहोत, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि… Continue reading पुढच्या निवडणुकाही आम्हीच जिंकणार : एकनाथ शिंदे

अमरनाथ दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू, पुण्यातील दोघे अडकले

जम्मू-काश्मीर (वृत्तसंस्था) : अमरनाथ गुहेजवळ ढगफुटीसदृश पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू  झाला आहे, तर ५० हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. याशिवाय काही लोक बेपत्ता असल्याचीही माहिती आहे. राष्ट्रीय आपत्ती निवार दल, राज्य आपत्ती  निवारण दलाचे जवान तसेच पोलीस आणि नागरी प्रशासनाचे अधिकारी-कर्मचारी आणि इंडो-तिबेटियन सीमा पोलिसांचे जवानही मदतकार्यात सहभागी झाले आहेत. ही… Continue reading अमरनाथ दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू, पुण्यातील दोघे अडकले

error: Content is protected !!