लष्कराची बस दरीत कोसळून १६ जवानांचा मृत्यू

सिक्कीम (वृत्तसंस्था) : सिक्कीममध्ये शुक्रवारी लष्कराची एक बस खोल दरीत कोसळून १६ लष्करी जवानांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. घटनास्थळी सध्या मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. उत्तर सिक्कीममधील लाचेनपासून १५ कि.मी. अंतरावरील जेमा भागात ही घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी लष्कराच्या तीन गाड्या जवानांना घेऊन जात होत्या. हा ताफा… Continue reading लष्कराची बस दरीत कोसळून १६ जवानांचा मृत्यू

बिहारमध्ये विषारी दारूमुळे ६० जणांचा मृत्यू

पाटण (वृत्तसंस्था) : बिहारमधील सारण (छपरा) येथे विषारी दारूमुळे ६० जणांचा मृत्यू झाल्यानंतर आता सिवानमधूनही मृत्यूच्या बातम्या येत आहेत. तेथे आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. बेगुसरायच्या तेघरा येथेही एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. यावरून विधानसभेत सलग तिसऱ्या दिवशी प्रचंड गदारोळ झाला. खुर्च्या फेकण्यात आल्या. आता सरकार बरखास्त करण्याची मागणी करत विरोधकांनी राजभवनावर मोर्चा काढण्याची… Continue reading बिहारमध्ये विषारी दारूमुळे ६० जणांचा मृत्यू

शेतीमालासाठी किमान हमीभावाचा कायदा करावा : राजू शेट्टी

रायपूर : देशातील १२५ कोटी जनतेला जर दोन वेळ पुरेल एवढे अन्नधान्य देशामध्ये पिकवायचे असेल, तर केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला किमान हमीभाव मिळावा, यासाठी संसदेत कायदा पारित करावा, अन्यथा भविष्यात भूकबळीचा गंभीर प्रश्न निर्माण होईल, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. रायपूर येथे एम.एस.पी गॅरंटी किसान मोर्चाच्या वतीने घेण्यात… Continue reading शेतीमालासाठी किमान हमीभावाचा कायदा करावा : राजू शेट्टी

भूपेंद्र पटेल दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान

अहमदाबाद (वृत्तसंस्था) : गुजरातचे नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. भूपेंद्र पटेल दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला. भाजपला १५६ जागांवर दणदणीत विजय मिळवला आणि पुन्हा एकदा सत्ता काबीज केली. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह देशभरातील महत्वाचे… Continue reading भूपेंद्र पटेल दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान

मोदींच्या हत्येसाठी तयार राहा : काँग्रेस नेत्याचे प्रक्षोभक विधान

पन्ना (मध्य प्रदेश) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येसाठी तयार राहा, असे प्रक्षोभक विधान मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते राजा पटेरिया यांनी केले आहे. त्यांचा यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यात ते आपल्या कार्यकर्त्यांना चिथावणी देत असल्याचे दिसून येत आहे. पटेरिया म्हणाले, मोदी निवडणूक पद्धत संपुष्टात आणतील. धर्म-जाती भाषेच्या आधारावर देशात फूट… Continue reading मोदींच्या हत्येसाठी तयार राहा : काँग्रेस नेत्याचे प्रक्षोभक विधान

हिमाचलच्या मुख्यमंत्रीपदी सुखविंदरसिंग सुक्खू

शिमला (वृत्तसंस्था) : सुखविंदर सिंग सुक्खू यांनी रविवारी दुपारी १.५० वाजता हिमाचलच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची विशेष उपस्थिती होती. मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार असलेल्या प्रतिभासिंह यांना प्रियांका गांधी यांनी आपल्या शेजारी बसवले. सुक्खू यांनी मंचावरून काँग्रेसच्या सर्व आमदारांसह समर्थकांना अभिवादन केले. रिज मैदानावर राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ यांनी… Continue reading हिमाचलच्या मुख्यमंत्रीपदी सुखविंदरसिंग सुक्खू

ब्राझीलसमोर क्रोएशियाचे आव्हान

कतार : फिफा विश्वचषक स्पर्धेत ग्रुप स्टेज त्यानंतर राऊंड ऑफ १६ चे सामने संपून आता उपांत्यपूर्व फेरीचे सामने सुरु होत आहेत. आजपासून उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांना सुरुवात होत असून, पहिला सामना ब्राझील आणि क्रोएशिया यांच्यात रात्री ८ वाजता सामना होणार आहे. आजचा सामना जिंकणारा संघ थेट उपांत्य फेरीत पोहोचणार असल्याने दोन्ही संघ विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करणार… Continue reading ब्राझीलसमोर क्रोएशियाचे आव्हान

मुख्यमंत्रीपदावरून हिमाचलमध्ये काँग्रेसमध्ये घमासान

सिमला (वृत्तसंस्था) : हिमाचल प्रदेशात मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेसमध्ये घमासान माजले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रतिभा सिंह यांच्या समर्थकांनी शुक्रवारी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी शिमल्यात पोहोचलेल्या पक्षाच्या निरीक्षकांचा ताफा अडवला. जोरदार नारेबाजी केली. हे समर्थक प्रतिभांना मुख्यमंत्री करण्याची मागणी करत होते. काँग्रेसच्या प्रचार समितीचे अध्यक्ष सुखविंदर सुक्खू यांनीही काँग्रेसपुढे आव्हान उभे केले आहे. ते विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी अजून शिमल्याला… Continue reading मुख्यमंत्रीपदावरून हिमाचलमध्ये काँग्रेसमध्ये घमासान

गुजरातमध्ये भाजपचा रेकॉर्ड ब्रेक विजय

अहमदाबाद (वृत्तसंस्था) : गुजरातमध्ये भाजपने १५६ जागा जिंकून विजयाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. माधवसिंह सोलंकी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने १९८५ मध्ये विधानसभेच्या १४९ जागा जिंकल्या होत्या. त्याच वेळी, नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना २००२ च्या निवडणुकीत भाजपने १२७ जागा जिंकल्या होत्या. या विजयासह भाजपने दोन्ही विक्रम मोडीत काढले आहेत. या ऐतिहासिक विजयानंतर १२ डिसेंबर रोजी गांधीनगर… Continue reading गुजरातमध्ये भाजपचा रेकॉर्ड ब्रेक विजय

गुजरातमध्ये ‘मेगा शो’ची तयारी

अहमदाबाद : गुजरातमध्ये सातव्यांदा भाजपने जवळपास १५७ जागांवर विजय मिळवला आहे. हा भाजपचा ऐतिहासिक विजय असून, येत्या १२ डिसेंबरला गुजरातमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. भूपेंद्र पटेल हेच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.  गुजरातमध्ये १२ डिसेंबर रोजी होणाऱ्या या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. भाजपला मिळालेल्या या… Continue reading गुजरातमध्ये ‘मेगा शो’ची तयारी

error: Content is protected !!