क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी विजयी

जामनगर (वृत्तसंस्था) : गुजरातमधील यंदाच्या निवडणुकीत चर्चा होती ती भाजपच्या रिवाबा जडेजाची. रिवाबा ही भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी. त्यामुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले होते. काही झाले तरी पत्नीला विजयी करायचेच असा इरादा जडेजाचा होता. त्याने तो तिला विजयी करुन सार्थ केला आहे. सध्या सोशल मीडियावर रिवाबाची चर्चा आहे. या दोन्ही सेलिब्रेटींवर नेटकऱ्यांनी… Continue reading क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी विजयी

गुजरातमध्ये भाजपला सत्तेबाहेर घालवण्यात काँग्रेस अपयशी

अहमदाबाद (विश्लेषण) : सत्तावीस वर्ष सत्ता उपभोगल्यानंतरही भाजप गुजरातमध्ये सत्तेत आली आहे. २७ वर्षे सत्तेत राहिलेल्या भाजपला सत्तेतून बाहेर घालवण्यात काँग्रेस अपयशी ठरली आहे. गुजरातमध्ये भाजपने रेकोर्डब्रेक विजय मिळवला आहे. काँग्रेसला अत्यंत कमी म्हणजे फक्त १९ जागांवर विजय मिळाला आहे. शिवाय काँग्रेसची मतांची टक्केवारी निम्म्याहून अधिक झाली आहे. गुजरातच्या इतिहासातील काँग्रेसचा हा सर्वात मोठा पराभव… Continue reading गुजरातमध्ये भाजपला सत्तेबाहेर घालवण्यात काँग्रेस अपयशी

गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यात ५९ टक्के मतदान

अहमदाबाद (वृत्तसंस्था) : गुजरात निवडणुकीसाठी दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले असून. जवळपास ५९ टक्के मतदानाची नोंद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. १८२ सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातील ९३ जागांसाठी आज मतदान झाले. पहिल्या टप्प्यासह दुसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानाची मतमोजणी ८ डिसेंबर रोजी होणार आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.… Continue reading गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यात ५९ टक्के मतदान

सून भाजपकडून रिंगणात, सासरा काँग्रेसच्या बाजूने

अहमदाबाद (वृत्तसंस्था) : गुजरात विधानसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातील प्रचार मंगळवारी सायंकाळी संपला, पण गुजरात विधानसभा निवडणुकीचा विषय आला की रवींद्र जडेजाच्या कुटुंबाचे नाव समोर येत आहे. क्रिकेटर रवींद्र जडेजाच्या घरी सध्या कौटुंबिक युद्ध सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे, तर दुसरीकडे त्याची बहीण काँग्रेसच्या उमेदवारासाठी प्रचार करत… Continue reading सून भाजपकडून रिंगणात, सासरा काँग्रेसच्या बाजूने

पेट्रोल, डिझेल १४ रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर जानेवारीपासून आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर आले आहेत. त्याचा आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट ८१ डॉलरच्या खाली आणि अमेरिकी क्रूड ७४ डॉलर प्रति बॅरलच्या जवळ आला आहे. यामुळे यंदा मेनंतर पहिल्यांदा पेट्रोल-डिझेलचे दर घटण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती १४ रुपयांनी स्वस्त होऊ… Continue reading पेट्रोल, डिझेल १४ रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता

‘टोयोटा-किर्लोस्कर’चे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचे निधन

बंगळुरु (वृत्तसंस्था) : देशातील ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीतील दिग्गज उद्योजक आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर (वय ६४) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. विक्रम किर्लोस्कर यांनी आपल्या कार्यकुशल नेतृत्वाने टोयोटाला भारतात वेगळ्या उंचीवर पोहोचवले होते. बंगळुरु येथील हेब्बल स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. टोयोटा कार भारतात लोकप्रिय करण्यात त्यांचे मोठे… Continue reading ‘टोयोटा-किर्लोस्कर’चे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचे निधन

कच्च्या तेलाच्या दरात घसरण

दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण सुरू आहे. काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल १०० डॉलरच्या जवळ पोहोचले होते; मात्र त्यानंतर आता कच्च्या तेलाच्या दरात घसरण सुरू झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरात घसरण सुरू असताना दुसरीकडे केंद्र सरकार आणि इंधन कंपन्यांनी भारतीय ग्राहकांना कोणताही दिलासा दिला नाही. इंधन कंपन्यांकडून आजचे… Continue reading कच्च्या तेलाच्या दरात घसरण

एकाच वेळी ‘इस्रो’ने आकाशात सोडले ९ उपग्रह

श्रीहरिकोटा (वृत्तसंस्था) : ‘इस्रो’ने आज (शनिवार) सकाळी ११.५६ वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरच्या लॉन्च पॅडवरून उपग्रह प्रक्षेपित केला. श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रातून पीएसएलवी-सी५४-इओएस-०६ रॉकेटने उड्डाण केले आहे. या रॉकेटमधून ओशनसॅट-३ उपग्रह आणि ८ नॅनो म्हणजे लहान उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. इस्रोच्या पीएसएलव्ही रॉकेट लाँचरची ही २४ वी मोहीम आहे. भूतानसाठी पाठविण्यात आलेला… Continue reading एकाच वेळी ‘इस्रो’ने आकाशात सोडले ९ उपग्रह

इफ्फी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव उद्यापासून

मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय सिने-सृष्टीत सध्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची म्हणजेच ‘इफ्फी’ची चर्चा आहे. उद्यापासून भारतातील या सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवाला सुरुवात होणार आहे. गोव्यात २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान हा महोत्सव पार पडणार आहे.  आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पाच मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. यात विक्रम पटवर्धन यांचा ‘फ्रेम’, दिग्पाल लांजेरकचा ‘शेर शिवराज’, डॉ.… Continue reading इफ्फी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव उद्यापासून

पहिल्या खासगी रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण

हैदराबाद (वृत्तसंस्था) भारतीय अंतराळ संशोधन संस्था- इस्रोने नवा इतिहास रचला आहे. इस्रोच्या श्रीहरीकोटा केंद्रावरून पहिले खासगी रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. हे रॉकेट स्कायरूट एरोस्पेस कंपनीचे आहे. या रॉकेटचे नाव विक्रम सबऑर्बिटल असे आहे. निर्धारित लक्ष्यानुसार हे रॉकेट अवकाशात १०० किलोमीटर प्रवास करेल आणि त्यानंतर ते समुद्रात कोसळणार आहे. या रॉकेटने सकाळी ११.३० वाजता सतीश… Continue reading पहिल्या खासगी रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण

error: Content is protected !!