अहमदाबाद : गुजरातमध्ये सातव्यांदा भाजपने जवळपास १५७ जागांवर विजय मिळवला आहे. हा भाजपचा ऐतिहासिक विजय असून, येत्या १२ डिसेंबरला गुजरातमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. भूपेंद्र पटेल हेच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

गुजरातमध्ये १२ डिसेंबर रोजी होणाऱ्या या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. भाजपला मिळालेल्या या ऐतिहासिक यशाचा जल्लोष मोठ्या प्रमाणावर केला जाणार असून, भूपेंद्र पटेल यांच्या शपथविधीचा ‘मेगा शो’ करण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे.