करवीर निवासिनी अंबाबाईच्या अर्पण साड्यांची शनिवारपासून विक्री

कोल्हापूर  (प्रतिनिधी):  करवीर निवासिनी श्री अंबाबाईला भाविकांकडून अर्पण केलेल्या प्रसाद साड्या देवस्थान समितीकडे उपलब्ध आहेत. या साड्यांची टेंबलाईवाडी येथील श्री. त्र्यंबोली देवस्थान,  देवस्थान व्यवस्थापन समिती हॉल  येथे  शनिवारपासून  (दि.११) विक्री केली जाणार आहे.  तरी भाविकांनी याचा लाभ घेण्याचे  आवाहन सचिव शिवराज नाईकवडे यांनी केले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुनच साड्यांची विक्री होणार आहे. प्रसाद… Continue reading करवीर निवासिनी अंबाबाईच्या अर्पण साड्यांची शनिवारपासून विक्री

मंडपात बाप्पाचे दर्शन घेण्यास मनाई : गणेशोत्सवासाठी नियमावली जारी  

मुंबई (प्रतिनिधी) : यंदाही कोरोनाच्या सावटाखाली राज्यात शुक्रवारपासून (दि.१०) गणेशोत्सव साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नियमावली जारी केली आहे. त्यानुसार भाविकांना मंडपात जाऊन बाप्पाचे दर्शन घेण्यास मनाई केली आहे. तर गणेश मंडळांनी बाप्पाच्या दर्शनाची ऑनालईन तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. संसर्गजन्य परिस्थिती लक्षात घेता या वर्षीचा गणेशोत्सव… Continue reading मंडपात बाप्पाचे दर्शन घेण्यास मनाई : गणेशोत्सवासाठी नियमावली जारी  

शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे  यांचा आंतरराज्य पुरस्काराने गौरव  

टोप (प्रतिनिधी) : शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे यांनी कोरोना आणि महापुराच्या काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बेळगाव येथील नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटीचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा आंतरराज्य पुरस्कार बेळगाव येथे खासदार अमरसिंह पाटील, माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर,  ब्रिगेडीयर सुधीर सावंत,  जिल्हा पोलिस प्रमुख महेश मेघण्णावार यांच्या हस्ते वितरित… Continue reading शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे  यांचा आंतरराज्य पुरस्काराने गौरव  

कोण जिंकणार प्रभाग आणि शहराचा सर्वोत्कृष्ट व्हायरल बाप्पा ? भाग घ्या आणि जिंका आकर्षक बक्षिसे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील आघाडीचे न्यूज वेबपोर्टल असलेल्या ‘लाईव्ह मराठी’ आणि मुख्य प्रायोजक ‘तेजस एंटप्रायजेस’ तर्फे शहरातील प्रत्येक प्रभागातील प्रायोजकाच्या सहकार्याने प्रभागनिहाय घरगुती गणेश सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी विनामुल्य असून ज्या प्रभागामध्ये प्रायोजक नाहीत अश्या वाचकांनाही यामध्ये भाग घेता येणार आहे. लाईव्ह मराठीच्या वतीने संपूर्ण शहरासाठी टॉपच्या पाच व्हायरल बाप्पांना विशेष… Continue reading कोण जिंकणार प्रभाग आणि शहराचा सर्वोत्कृष्ट व्हायरल बाप्पा ? भाग घ्या आणि जिंका आकर्षक बक्षिसे

पूरग्रस्तांना तातडीने शासकीय मदत मिळावी : कळे ग्रामस्थांची मागणी

कळे (प्रतिनिधी) : पूरग्रस्तांना दीड महिना उलटूनही शासकीय मदत मिळालेली नाही. ती तातडीने मिळावी, अशी मागणी कळे येथील पूरग्रस्तांनी मंडल अधिकारी सुरेश ठाकरे यांच्याकडे निवेदनाकडे केली आहे. ही मदत लवकरात लवकर नाही मिळाली तर आंदोलनाचा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की, जुलै महिन्यात आलेल्या महापुरात कळे बाजारपेठेचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. महसूल विभागाने… Continue reading पूरग्रस्तांना तातडीने शासकीय मदत मिळावी : कळे ग्रामस्थांची मागणी

जनसंघर्ष सेनेतर्फे पंतप्रधानांना मातीची चूल, शेणी भेट

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जनसंघर्ष सेनेच्या वतीने अन्यायी इंधन दरवाढीविरोधात केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातीची चूल आणि शेणी पाठवण्यात आली. शनिवार पेठ पोस्ट ऑफिसच्या अधिकाऱ्यांकडे या वस्तू सुपूर्द करण्यात आल्या. आंतरराष्ट्रीय पातळीवर गॅसचे दर स्थिर असताना केंद्र सरकारने केलेली दरवाढ ही अन्यायी आहे. लॉकडाऊन, कोवीड निर्बंधांमुळे जगण्यासाठी तारेवरची कसरत करावी… Continue reading जनसंघर्ष सेनेतर्फे पंतप्रधानांना मातीची चूल, शेणी भेट

…अन्यथा राज्यभरात जनआंदोलन उभारणार : राजेंद्र देशमुख

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्य शासनाने २२ जुलै २०२१ रोजी विनाअनुदानित शिक्षण संस्थांना शिष्यवृत्ती संदर्भात २५ टक्के निधी देण्याचा आदेश काढल्याने विनाअनुदानित शिक्षण संस्था आर्थिक संकटात सापडल्या आहेत. त्यामुळे हा अन्यायकारक शासन आदेश रद्द करुन नवीन आदेश काढवा. विनाअनुदानित शिक्षण संस्थांना नियमित आणि वेळेत १०० टक्के शिष्यवृत्ती मिळावी. अन्यथा राज्यभरात जनआंदोलन उभारु असा इशारा आज (मंगळवार)… Continue reading …अन्यथा राज्यभरात जनआंदोलन उभारणार : राजेंद्र देशमुख

नेर्ली येथे गोकुळ शॉपीचे उद्घाटन

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  नेर्ली (ता.करवीर) येथे गोकुळच्‍या दूध व दुग्‍धजन्य पदार्थ शॉपीचे उद्घाटन गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील यांच्या हस्ते व माजी चेअरमन व ज्येष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, करवीर पंचायत समिती सभापती मंगल पाटील, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, प्रकाश पाटील, कार्यकारी संचालक डी. व्‍ही. घाणेकर यांच्या उपस्थित नुकतेच झाले. चेअरमन विश्‍वास पाटील म्हणाले की,… Continue reading नेर्ली येथे गोकुळ शॉपीचे उद्घाटन

केंद्र सरकारविरोधात न्याय निवाडा लोकनेता फौंडेशनचा मोर्चा

इचलकरंजी (प्रतिनिधी) : न्याय निवाडा लोकनेता फौंडेशनच्या वतीने वाढत्या महागाई विरोधात इचलकरंजीतील गांधी पुतळ्यापासून प्रांत कार्यालयावर आज (मंगळवार) मोर्चा काढला. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत वाढती महागाई कमी करण्याची मागणी केली. तसेच विविध मागणीचे निवेदन प्रांत कार्यालयात नायब तहसीलदार उदयसिंह गायकवाड यांना दिले. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या… Continue reading केंद्र सरकारविरोधात न्याय निवाडा लोकनेता फौंडेशनचा मोर्चा

आळतेमध्ये छ. शिवाजी महाराज चौक सुशोभिकरणासाठी १५ लाखांचा निधी…

हातकणंगले (प्रतिनिधी) : आळते मधील छ. शिवाजी महाराज चौकाच्या सुशोभीकरणासाठी आ. राजू आवळे यांनी १५ लाखांचा निधी देण्याचे जाहीर केले आहे. या चौकाचे पं.स. सदस्य बी. जे. पाटील यांच्या फंडातून तीस वर्षांपूर्वी सुशोभीकरण करण्यात आले होते. आळतेतील छ. शिवाजी चौकामध्ये आधुनिक पद्धतीची दोन मजली आरसीसी इमारत उभी रहावी ही इथल्या नागरीकांची इच्छा होती. यासाठी आ.… Continue reading आळतेमध्ये छ. शिवाजी महाराज चौक सुशोभिकरणासाठी १५ लाखांचा निधी…

error: Content is protected !!