हातकणंगले (प्रतिनिधी) : आळते मधील छ. शिवाजी महाराज चौकाच्या सुशोभीकरणासाठी आ. राजू आवळे यांनी १५ लाखांचा निधी देण्याचे जाहीर केले आहे. या चौकाचे पं.स. सदस्य बी. जे. पाटील यांच्या फंडातून तीस वर्षांपूर्वी सुशोभीकरण करण्यात आले होते.

आळतेतील छ. शिवाजी चौकामध्ये आधुनिक पद्धतीची दोन मजली आरसीसी इमारत उभी रहावी ही इथल्या नागरीकांची इच्छा होती. यासाठी आ. राजू आवळे यांची आज (सोमवार) काँग्रेस कमिटीमध्ये या चौकाचे आजी-माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्यांनी भेट घेतली. यावेळी आ. आवळे यांनी, इमारत उभारणीसाठी १५ लाखांचा निधी देणार आहे. यापेक्षा जास्त निधी लागल्यास मी तो देणार असून हे काम शिवजयंतीपूर्वी पूर्ण करणार असल्याची ग्वाही दिली.

यावेळी पं.स. सदस्य राजु भोसले, प्रवीण जणगोंडा, अशोक पाटील, शकील अत्तार, मोहन कोळेकर, इमाम मुल्ला, राम कांबळे, दीपक कदम,तानाजी खरात, जावेद मुजावर, बापू देसाई, रमेश कांदेकर, किसन देवकाते, विनोद आदी उपस्थित होते.