कळे (प्रतिनिधी) : पूरग्रस्तांना दीड महिना उलटूनही शासकीय मदत मिळालेली नाही. ती तातडीने मिळावी, अशी मागणी कळे येथील पूरग्रस्तांनी मंडल अधिकारी सुरेश ठाकरे यांच्याकडे निवेदनाकडे केली आहे. ही मदत लवकरात लवकर नाही मिळाली तर आंदोलनाचा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, जुलै महिन्यात आलेल्या महापुरात कळे बाजारपेठेचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. महसूल विभागाने दोनवेळा केलेले पंचनामे योग्य असून ते आम्हाला मान्य आहेत. तरीही कांही राजकिय लोक स्वार्थासाठी विनाकारण महसूल आणि ग्रामपंचायतीला  वेठीस धरत आहे. त्यामुळे शासकीय मदत मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे तातडीने पूरग्रस्तांच्या खात्यावर शासकीय मदत वर्ग करावी. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

यावेळी मनोज पाटील, सुरेश पाटील, राहुल कोळेकर, राजेंद्र देसाई, गजानन कालेकर, सोनदेव बेलेकर, गोविंद पाखरे,  तरुण पटेल, विजय नरुटे, शिवसेना शाखाप्रमुख सुरेश पोवार  आदींच्या सह्या निवेदनावर आहेत.