टोप (प्रतिनिधी) : शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे यांनी कोरोना आणि महापुराच्या काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बेळगाव येथील नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटीचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा आंतरराज्य पुरस्कार बेळगाव येथे खासदार अमरसिंह पाटील, माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर,  ब्रिगेडीयर सुधीर सावंत,  जिल्हा पोलिस प्रमुख महेश मेघण्णावार यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. 

सन २०२० मध्ये संपूर्ण जगभरात कोरोना महामारी आली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केले. यामुळे शिरोली परिसरातील परप्रांतीय कामगार तसेच गावातील गोरगरीब जनतेची उपासमार होऊ नये, त्यांना अन्नधान्य पुरवठा करणे गरजेचे होते. सरपंच शशिकांत खवरे यांनी पुढाकार घेऊन गावातील लोकांना सुमारे एक महिना मोफत धान्य वाटपाचे काम सुरू ठेवले होते. त्याचबरोबर त्यांनी  २०१९ व २०२१ आलेल्या महापुरातही उल्लेखनीय काम केले.

त्यांच्या या कार्याची दखल घेऊन बेळगाव येथील नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटीने पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. यावेळी उपसरपंच सुरेश यादव,  उत्तम पाटील उपस्थित होते.