कोल्हापूर (प्रतिनिधी) :  नेर्ली (ता.करवीर) येथे गोकुळच्‍या दूध व दुग्‍धजन्य पदार्थ शॉपीचे उद्घाटन गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील यांच्या हस्ते व माजी चेअरमन व ज्येष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, करवीर पंचायत समिती सभापती मंगल पाटील, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, प्रकाश पाटील, कार्यकारी संचालक डी. व्‍ही. घाणेकर यांच्या उपस्थित नुकतेच झाले.

चेअरमन विश्‍वास पाटील म्हणाले की, गोकुळच्या उच्च दर्जाच्या उत्पादनामुळे ग्राहकांचे निश्चितच समाधान होईल. या शॉपीमध्‍ये दूध, तूप, पनीर, दही, ताक, लस्सी, श्रीखंड, बासुंदी आदी पदार्थ उपलब्ध आहेत.

यावेळी गोकुळचे मार्केटिंग विभागाचे हणमंत पाटील, लक्ष्मण धनवडे, शॉपीचे मालक अशोक गुरव, शंकर पाटील, भाऊसो चौगुले, के. टी. मगदूम, अजिंक्‍य पाटील, पृथ्‍वीराज पाटील आदी उपस्थित होते.