मुंबई (प्रतिनिधी) : ओबीसी समाजाचा इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा ठराव राज्य सरकारने केला आहे. तर एप्रिल आणि मे महिन्यात पाऊस नसल्यामुळे यावेळी या निवडणुका घेता येतील, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

तीन एक महिन्यात म्हणजे मार्च अखेरपर्यंत हा डेटा द्यावा. तो दिल्यानंतर एप्रिलमध्येही निवडणुका घेतल्या तरी चालतील. राज्यात ओबीसी समाजा ५४ टक्के आहे. त्यांना त्यांचे प्रतिनिधित्व मिळाणे हा त्यांचा हक्कच आहे. आम्ही वकिलामार्फत प्रयत्न केले आहेत. आता पुढची सुनावणी जानेवारीत आहे. तोपर्यंत डेटा मिळवण्याचे काम गतीने करू. आयोगाला सर्व सुविधा देऊ. डेटा मिळाल्यानंतर सर्व प्रकारे मार्ग काढू, असेही त्यांनी सांगितले.