मुंबई (प्रतिनिधी) : सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांची काँग्रेसच्या प्रवक्तेपदी निवड करण्यात आली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबतचे पत्र काढले असून महाराष्ट्र काँग्रेस कार्याकारिणीने याची ट्विटवर माहिती दिली आहे.

माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांची कन्या असलेल्या प्रणिती शिंदे यांची अभ्यासू आमदार म्हणून ओळख आहे. काँग्रेसमधील एक आश्वासक युवा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. तरूणाईमध्ये त्यांची एक क्रेझ निर्माण झाली आहे.    भाजप आणि आयएमआयएम विरोधात पक्षाला आक्रमक भूमिका घेण्यासाठी प्रणिती यांच्याकडे ही जबाबदारी दिल्याचे सांगितले जाते.

भावना जैन, गोपाल तिवारी, निजामुद्दीन राईन, सुधीर ढोणे, चारुलता टोकस, हेमलता पाटील, दिलीप एडतकर, भरत सुरेश सिंह यांचीही प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. तर कपिल ढोके, बालाजी गाडे आणि शमीना शेख यांची मीडिया पॅनलिस्ट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.