आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा लांबणीवर…

मुंबई (प्रतिनिधी) : पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे येत्या १० जूनला अयोध्येला जाऊन राम लल्लाचे दर्शन घेणार होते. पण त्यांचा हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली. १० जूनला राज्यसभेची निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर हा दौरा लांबणीवर टाकण्यात आला आहे. आदित्य ठाकरे यांच्यासोबत अनेक शिवसेना नेते, आमदार अयोध्येला जाणार होते.… Continue reading आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा लांबणीवर…

देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा कोरोनाची लागण…

मुंबई (प्रतिनिधी) : भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती फडणवीसांनी स्वतः ट्विट करुन दिली आहे. अलीकडेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूर दौरा रद्द करण्यात आला. हा दौरा रद्द करून फडणवीस हे मुंबईत… Continue reading देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा कोरोनाची लागण…

दिलीप पाटील यांची ‘आप’च्या कोल्हापुर जिल्हा सचिवपदी निवड…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आम आदमी पार्टीच्या जिल्हा सचिवपदी दिलीप पाटील यांची निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या राज्य बैठकीत हे निवडीचे पत्र राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी दिले. दिलीप पाटील हे इलेक्ट्रॉनिक्स अभियंता आणी प्रगत संगणकामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे. त्यांनी संशोधन विकास आणी प्रोजेक्ट प्रोग्राम मँनेजर म्हणून सिम्बियन, लंडन, नोकिया, बंगलोर येथे काम केले… Continue reading दिलीप पाटील यांची ‘आप’च्या कोल्हापुर जिल्हा सचिवपदी निवड…

घराघरात राष्ट्रवादी विचार पोचवण्यासाठी प्रयत्न करावेत : आर. के. पोवार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : एक तास राष्ट्रवादीसाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी या संकल्पनेचे पाचवे पर्व आज जुना बुधवार पेठ तालीम हॉल येथे संपन्न झाले. पदाधिकारी गणेश जाधव यांनी या चर्चासत्राचे आयोजन केले होते. यावेळी शहराध्यक्ष आर.के. पोवार यांनी घराघरात राष्ट्रवादीचे विचार पोहचवण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. आर के पोवार म्हणाले, विकास कामाच्या माध्यमातून शहरात राष्ट्रवादी… Continue reading घराघरात राष्ट्रवादी विचार पोचवण्यासाठी प्रयत्न करावेत : आर. के. पोवार

राज्यसभेची सहावी जागा मविआच जिंकणार : खा. संजय राऊत

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यसभेच्या चारही जागा महाविकास आघाडी जिंकणार आहे. सहाव्या जागेवर देखील महाविकास आघाडीचा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होऊन राज्यसभेवर जाईल. या निवडणुकीत भाजपने उगीचच पैसा वाया घालवू नये. पैसे असतील तर सामाजिक कार्यासाठी वापरावे, अशी खोचक टीका शिवसेनेचे खा. संजय राऊतांनी भाजपवर केली आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध… Continue reading राज्यसभेची सहावी जागा मविआच जिंकणार : खा. संजय राऊत

मुख्यमंत्र्यांची ८ जून रोजी औरंगाबादमध्ये सभा…

औरंगाबाद (प्रतिनिधी) :  शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये ८ जून रोजी सभा होणार आहे. त्यासाठी आठवडाभरापासून ठिकठिकाणी बैठकांसह आता थेट जनसामान्यांशी संवादाच्या माध्यमातून सभेचे निमंत्रण देण्यात येत आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख आणि आ. अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे उद्यान, बाळासाहेब ठाकरे बॉटनिकल गार्डन, एमजीएम मैदानावर जाऊन मॉर्निंग वॉक, योग साधना, खेळण्यासाठी… Continue reading मुख्यमंत्र्यांची ८ जून रोजी औरंगाबादमध्ये सभा…

राज्यात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच : धनंजय मुंडे

सातारा (प्रतिनिधी) : राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु असतानाच ‘पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल’ असा दावा महाविकास आघाडीतील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केला  आहे. ते साताऱ्यातील डिस्कळ येथील सभेत बोलत होते. यामुळे पुन्हा एकदा एका नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. राज्यात मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीचे नेते दररोज नवनवीन वक्तव्ये करीत आहेत. राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया… Continue reading राज्यात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच : धनंजय मुंडे

मतदानाच्या परवानगीसाठी अनिल देशमुख यांची न्यायालयात धाव…

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आता निवडणूक होत आहे. या निवडणुकीत मतदानासाठी परवानगी द्यावी म्हणून तुरुंगात असलेला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. तर महाविकास आघाडीचे दुसरे मंत्री नवाब मलिक हेदेखील तुरुंगात आहेत. त्यांच्या मतासाठी सुद्धा न्यायालयाकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत सध्या घोडेबाजाराकडे सर्वांचे लक्ष असल्याने यात… Continue reading मतदानाच्या परवानगीसाठी अनिल देशमुख यांची न्यायालयात धाव…

‘मविआ’च्या एकोप्यावर संजय पवारांचे भवितव्य..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आपापला उमेदवार मागे घेण्यावरून महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात आज (शुक्रवार) सकाळी झालेल्या खलबतानंतर ‘मविआ’ आणि ‘भाजप’ हे दोघेही निवडणूक लढवण्यावर ठाम राहिल्याने आता राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आरपारची लढाई अटळ आहे. कोल्हापुरातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार आणि माजी खा. धनंजय महाडिक या दोघांमधील सामना आता चुरशीचा होणार यात कसलाही संदेह नाही. अपक्ष… Continue reading ‘मविआ’च्या एकोप्यावर संजय पवारांचे भवितव्य..!

केळोशी उपसरपंचपदी कृष्णात पाटील यांची बिनविरोध निवड…

धामोड (प्रतिनिधी) :  राधानगरी तालुक्यातील केळशी बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कृष्णात पाटील यांची आज (शुक्रवार) बिनविरोध निवड झाली. मावळते उपसरपंच तानाजी लहू कोदले यांचा कार्यकाळ संपल्यामुळे सरपंच के. एल. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली. सरपंच के. एल. पाटील म्हणाले, एक गाव आणि अनेक वाड्यांची ही ग्रुप ग्रामपंचायत आहे. सर्वांना या पदाचा मान मिळावा,… Continue reading केळोशी उपसरपंचपदी कृष्णात पाटील यांची बिनविरोध निवड…

error: Content is protected !!