इस्लामपूर (प्रतिनिधी) : इस्लामपूर (ता. वाळवा) शहराचे इश्वरपूर नामकरण करण्यासाठी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या मागणीवरुन तसा ठराव करण्यासाठी पालिकेची विशेष सभा आज (शुक्रवार) बोलवली होती. सभेपूर्वी शिवसेनेने पालिकेसमोर शक्तीप्रदर्शन करत आपली मागणी लावून धरली.

नामकरणाच्या मागणीसाठी शिवसेनेने शहरात स्वाक्षरी मोहीम राबवली होती.  तत्पुर्वी शिवसेना कार्यालयापासून शिवसैनिक भगवे फेटे नेसून, भगवे ध्वज हातात घेवून वाजत गाजत पालिकेसमोर एकत्र आले. यावेळी पालिका परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.