कोल्हापूर (प्रतिनिधी) : बेळगाव येथे पार पडलेल्या रोट्रॅक्ट डिस्ट्रिक्ट ३१७० च्या वार्षिक क्रीडा आणि  सांस्कृतिक स्पर्धेत रोट्रॅक्ट क्लब ऑफ करवीर व्हिजन कोल्हापूर या संघाने घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यातील विविध रोट्रॅक्ट क्लबसच्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

क्रीडा प्रकारात क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, बुद्धिबळ, टेबल टेनिस, १०० मी. धावणे, १०० मी. रिले, कॅरम आदी, तर सांस्कृतिक प्रकारात डान्स, ग्रुप डान्स, एक्स फॅक्टर, mr and miss fiesta आदी प्रकाराचा समावेश होता. या स्पर्धेत करवीर व्हिजनच्या तब्बल ३० सदस्यांनी सहभाग घेतला होता. फुटबॉल, १०० मी. धावणे (मुली) आणि १०० मी. रिले या तिन्ही प्रकारांंत विजेतेपद मिळवले आहे. एक्स फॅक्टरमध्ये विजेतेपद, ग्रुप डान्स उपविजेतेपद तसेच सर्वच प्रकारामध्ये सर्वात वक्तशीर क्लब असे पुरस्कार पटकावला आहे.