अ‍ॅडलेड : टी-२० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताचा सामना गुरुवारी १० नोव्हेंबर रोजी इंग्लंडशी होत आहे. सध्या भारताची बाजू भक्कम असून, या सामन्यात इंग्लंडला धूळ चारून भारत अंतिम फेरीत धडक मारेल, अशी तमाम क्रिकेट शौकिनांची इच्छा आहे. ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅडलेड ओव्हल येथे हा सामना होईल. भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता हा सामना खेळवला जाईल. सामना सुरु होण्याच्या अर्धा तास अगोदर एक वाजता टॉस होईल.

अ‍ॅडलेड ओव्हलवर होणार आहे. टी-२० वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया चौथ्यांदा इंग्लंडशी भिडणार आहे. भारतीय संघाने टी-२० विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला दोनदा पराभूत केले आहे. इंग्लंडचा संघ एक सामना जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. त्याच वेळी, दोन्ही संघ टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत २२ वेळा भिडले आहेत. भारतीय संघ १२ वेळा विजय मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. त्याचबरोबर इंग्लंड संघाने भारताविरुद्ध १० वेळा विजय मिळवला आहे.

या सामन्यापूर्वी इंग्लंड संघाचे टेन्शन वाढले आहे. इंग्लंडचा स्टार फलंदाज डेव्हिड मलान आणि स्टार वेगवान गोलंदाज मार्क वुड यांच्या तंदुरुस्तीबाबत अजूनही शंका आहेत. हे दोन्ही खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त नसतील तर ते उपांत्य फेरीतून बाहेर पडू शकतात.

बटलरला या दोघांच्या फिटनेसबद्दल विचारले असता तो म्हणाला, ‘मलान आणि वुड या दोघांच्या खेळावर शंका आहे. पण सामन्याच्या दिवशी दोघांची परिस्थिती काय आहे ते बघून संघात सामील करण्यात येईल. आम्हाला आमच्या फिजिओवर विश्वास आहे. खेळाडू तंदुरुस्त असावेत, अशी आमची इच्छा आहे. संघातील प्रत्येक खेळाडूवर आमचा पूर्ण विश्वास आहे. जेव्हा आम्ही पाकिस्तान दौऱ्यावर गेलो होतो तेव्हा आम्ही युवा खेळाडूंना संधी दिली आणि त्यांनी चांगली कामगिरी केली होती.

संघातील प्रत्येक खेळाडूंवर आमचा विश्वास आहे. पाकिस्तान दौऱ्यात आम्ही अधिक युवा खेळाडूंना संधी दिली होती. त्यांनी प्रदर्शनही चांगले केले. फिल सॉल्ट हा उत्तम माइंडसेटचा खेळाडू आहे, खासकरून आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये. तो असा खेळाडू आहे ज्याचे लक्ष्य संघासाठी चांगली कामगिरी करण्यावर असते,” असेही बटलर म्हणाला.

इंग्लंडचा या स्पर्धेतील शेवटचा साखळी सामना श्रीलंकेविरुद्ध झाला. या सामन्यात स्फोटक फलंदाज डेविड मलान क्षेत्ररक्षण करताना दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे तो फलंदाजी करण्यासही आला नाही. यानंतर वेगवान गोलंदाज मार्क वूड हा ओव्हलमध्ये भारताविरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वीच्या सराव सत्रातून बाहेर झाला होता. शरीरात त्रास होत असल्यामुळे त्याने सराव सत्रात भाग घेतला नाही. स्पर्धेतील सर्वात खतरनाक गोलंदाज वूड हा स्पर्धेतील सर्वात वेगवान गोलंदाज राहिला आहे आणि त्याने चार सामन्यात ९ गडी बाद केले आहेत.