अ‍ॅडलेड (वृत्तसंस्था) : इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात भारताचा लाजीरवाणा पराभव झाला. इंग्लंड संघाने भारताचा अक्षरशः धुव्वा उडवला आहे. टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य लढतीत इंग्लंडने भारतावर १० गडी राखून दणदणीत विजय मिळवला. एलेक्‍स हेल्‍स आणि जोस बटलर या सलामी जोडीने सर्वभार स्वतःच्या खांद्यावर घेऊन आपल्या संघाला मोठा विजय मिळवून दिला. इंग्लंड आता थेट रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तानविरुद्ध विजेतेपदासाठी मैदानात उतरणार आहे. पाकिस्तानने बुधवारी न्यूझीलंडवर नमवून तिसऱ्यांदा अंतिमपर्यंत मजल मारली आहे.

टी-२० वर्ल्‍ड कप च्या दुसऱ्या उपांत्य लढतीत हार्दिक पंड्याच्या ३३ चेंडूत ६३ धावा आणि विराट कोहलीच्या ५० धावांच्या जोरावर टीम इंडियाने निर्धारित २० षटकात ६ विकेटच्या नुकसानावर १६८ धावा केल्या. हार्दिकने पाच षटकार आणि चार चौकारचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. तर विराट कोहलीने देखील संकटांत सापडलेल्या आपल्या संघाला बाहेर काढले. कोहलीने ४० चेंडूत ५० धावांचे योगदान दिले.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी संधी मिळालेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली.‌ राहुल केवळ पाच धावा काढून माघारी परतला. कर्णधार रोहित जम बसल्यानंतर २७ तर सूर्यकुमार यादव १४ धावा करून बाद झाले.‌ एका बाजूने शानदार पद्धतीने खेळत असलेल्या विराट कोहलीने अर्धशतक पूर्ण केले. मात्र, अर्धशतक पूर्ण करतात तो तंबूत परतला. त्यानंतर हार्दिक पंड्याने भारतीय डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. सुरुवातीला अंदाज घेतल्यानंतर त्याने अखेरच्या चार षटकात अक्षरशः इंग्लिश गोलंदाजांची धुलाई केली.

अखेरच्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी त्याने ४ चौकार व ५ षटकारांसह ३३ चेंडूवर ६३ धावा केल्या. त्याच्या या आक्रमक खेळीमुळे भारतीय संघ ६ बाद १६८ अशी मजल मारू शकला. एका बाजूने शानदार पद्धतीने खेळत असलेल्या विराट कोहलीने अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे स्पर्धेतील चौथे अर्धशतक ठरले. तसेच यादरम्यान त्याने आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ४००० धावांचा टप्पा पूर्ण केला. त्याने ५० धावांची खेळी केली. यामध्ये ४ चौकार व एका षटकाराचा समावेश होता.

भारताचे फलंदाज एकामागून एक बाद होत होते, पण त्यावेळी संघाचा डाव सावरला तो कोहलीने. कारण यावेळी फक्त संघाला डाव सावरला नाही तर त्याने विश्वविक्रमही रचला. कोहलीने आता टी२० क्रिकेटमध्ये चार हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोहलीने हा विक्रम करत आपल्या नावाला एक वेगळे वलय निर्माण झाले आहे. या विश्वचषकात कोहली भन्नाट फॉर्मात आहे. त्यामुळे आता कोहली या विश्वचषकात नेमक्या किती धावा करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. कोहली हा भारतासाठी मॅचविनर ठरत असल्याचे पाहायला मिळत होते. पण भारताला हा सामना गमवावा लागला. दारूण पराभवामुळे भारतीय संघ टी२० विश्वचषकातून बाहेर पडला आहे. यासह भारतीय संघाचे दुसऱ्यांदा टी-२० विश्वविजेतेपदाचे स्वप्न अधुरे राहिले.