केडीसीसीने केली कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी दोन लाखांची तरतूद…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्मचारी कल्याण मंडळामार्फत कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांच्या उपचारांच्या हॉस्पिटल खर्चासाठी म्हणून वैद्यकीय विमा योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत यापुढे बाधित होणाऱ्या कर्मचाऱ्याला दोन लाखापर्यंत हॉस्पिटलचा खर्च  मिळणार आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या आज झालेल्या सभेत हा निर्णय झाला. कर्मचाऱ्यांचे आरोग्य सांभाळण्याच्या दृष्टीने बँकेने कोणती काटकसर न करता सर्व आजारासहित… Continue reading केडीसीसीने केली कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी दोन लाखांची तरतूद…

केडीसीसीमार्फत जिल्ह्यातील गटसचिवांना विमा संरक्षण…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने जिल्ह्यातील सर्वच गटसचिवांना जीवन विमा व वैद्यकीय विमा योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १८६० संस्थाकडील कार्यरत सर्वच म्हणजे १०२१ गटसचिवांचा समावेश या योजनेत केला आहे. दुर्दैवाने कोरोनासह अन्य कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून पाच लाखांचा विमा व कोरोनासह अन्य कोणत्याही आजाराच्या उपचारासाठी  आयसीआयसीआय… Continue reading केडीसीसीमार्फत जिल्ह्यातील गटसचिवांना विमा संरक्षण…

संजय पाटील यांच्या केसाला धक्का लागला ‘तर’ : विविध संघटनांचा इशारा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव तसेच अखिल भारतीय किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील गेली वीस वर्षे आपल्या आक्रमक आंदोलनामुळे प्रसिद्ध आहेत. किंबहुना ते आंदोलक म्हणून संपूर्ण जिल्ह्याला परिचित आहेत. पण आंदोलनाचा राग मनात धरून काही व्यक्ती त्यांच्या विरुद्ध कट आणि षडयंत्र रचत आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. याची कल्पना कोल्हापूर… Continue reading संजय पाटील यांच्या केसाला धक्का लागला ‘तर’ : विविध संघटनांचा इशारा

‘मास्क नाही प्रवेश नाही’ हा उपक्रम राज्यभर राबवा : उद्धव ठाकरे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेतंर्गत कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी ‘मास्क नाही प्रवेश नाही, मास्क नाही वस्तूही नाही, मास्क नाही सेवा नाही’ हा अभिनव उपक्रम राज्यभर राबवायला हवा, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरच्या जनजागृती मोहिमेचा गौरव केला. पुणे महसूल विभागातील जिल्ह्यांशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्हिडिओ प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका… Continue reading ‘मास्क नाही प्रवेश नाही’ हा उपक्रम राज्यभर राबवा : उद्धव ठाकरे

खानापूर येथे वाफेचे मशीन, मास्कचे वाटप…

गारगोटी (प्रतिनिधी) :  भुदरगड तालुक्यातील खानापूर येथील आदर्श महिला दूध संस्थेच्या वतीने दुध उत्पादक सभासदानां कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाफेचे मशिन आणि मास्कचे केले. तसेच याचे फायदे काय आहेत याची माहिती देण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक भुजंगराव मगदुम, चेअरमन अरुणा मगदूम, गोकुळचे सुपरवायझर विक्रम पाटील, टेक्निशियन आनंदराव देसाई, अनिता घरपणकर, मयुरी पाटील, जयश्री गुरव, किरण पाटील, अवधूत… Continue reading खानापूर येथे वाफेचे मशीन, मास्कचे वाटप…

कोल्हापूरात पुन्हा एकदा घडले माणूसकीचे दर्शन…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : इंद्रजित फराक्टे (रा. कोल्हापूर) यांचे आज शिवाजी पेठ ते जुना वाशी नाक्यादरम्यान पाकिट हरवले होते. त्यामध्ये त्यांची महत्त्वाची कागदपत्रे आणि बहीणीच्या औषधोपचारासाठी ठेवलेली 14 हजारांची रक्कम गहाळ झाली. हे पाकिट कोल्हापूरात सीपीआर रुग्णालयात कर्मचारी असलेले किरण सराटे यांना सापडले. त्यांनी पाकिटातील कागदपत्रावरून किरण सराटे यांनी फराक्टे यांच्याशी संपर्क साधला आणि प्रामाणिकपणे ते… Continue reading कोल्हापूरात पुन्हा एकदा घडले माणूसकीचे दर्शन…

शाहुपूरीत नाष्टा सेंटर मालकाला मारहाण : चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नाष्टा सेंटरमध्ये सॅंडविच आणि वडापाव खाण्यास मनाई केल्याच्या रागातून चौघांनी केलेल्या मारहाणीत विक्रेता आणि त्याचा कामगार हे दोघे जण गंभीर जखमी झाले. उमेश अरुण जाधव (वय 30,  मूळ रा. तस्ते गल्ली, मंगळवार पेठ, सध्या रा. राजारामपुरी 8 वी गल्ली), आकाश मारुती बोडके अशी जखमींची नावे आहेत. या प्रकरणी उमेश जाधव यांनी सुरज… Continue reading शाहुपूरीत नाष्टा सेंटर मालकाला मारहाण : चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

स्व. अण्णासाहेब पाटील यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही: वसंतराव मुळीक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्यासह ४२  युवकांनी मराठा आरक्षणासाठी आहुती दिली. त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. यासाठी मराठा आरक्षण लढ्यात जिल्ह्यात एकीची वज्र मूठ करण्याचा निर्णय घेण्यात आला,’ असे प्रतिपादन वसंतराव मुळीक यांनी केले. मराठा आरक्षणासाठी पहिले बलिदान देणारे अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक, अध्यक्ष स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या ८७ व्या जयंतीनिमित्त मराठा… Continue reading स्व. अण्णासाहेब पाटील यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही: वसंतराव मुळीक

कोरोना प्रतिबंधासाठी सर्वेक्षण मोहीम ‘यांच्या’मुळे गतीमान होणार : आयुक्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत सुरु असलेल्या सर्वेक्षणाला एनसीसी आणि एनएसएसच्या विदयार्थ्यांची साथ मिळाली आहे. त्यामुळे ही मोहिम अधिक गतीमान होण्यास निश्तिपणे मदत होईल असा विश्वास आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केला. महानगरपालिकेच्या राजारामपूरी येथील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेतील सर्वेक्षणसाठी आरोग्य कर्मचारी… Continue reading कोरोना प्रतिबंधासाठी सर्वेक्षण मोहीम ‘यांच्या’मुळे गतीमान होणार : आयुक्त

पेठवडगावमध्ये सर्वपक्षीय कृती समितीकडून शेतीविषयी विधेयकांची होळी

पेठवडगाव (प्रतिनिधी) : पेठवडगावमध्ये सर्वपक्षीय कृती समितीकडून नगरपालिकेच्या चौकात लोकसभेत पास केलेल्या शेतीविषयी विधेयकांची होळी करण्यात आली. दरम्यान, केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध म्हणून घोषणा देण्यात आल्या. आमदार राजू आवळे म्हणाले, ‘चहा विकणाऱ्या पंतप्रधानाने देश विकायला काढला असून दोन्ही शेतीविषयी विधेयकांमुळे पिकांची सरकारी खरेदी पूर्णपणे थांबेल. तसेच खासगी बाजार स्थापन होऊन शेतकऱ्यांना… Continue reading पेठवडगावमध्ये सर्वपक्षीय कृती समितीकडून शेतीविषयी विधेयकांची होळी

error: Content is protected !!