कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्यासह ४२  युवकांनी मराठा आरक्षणासाठी आहुती दिली. त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. यासाठी मराठा आरक्षण लढ्यात जिल्ह्यात एकीची वज्र मूठ करण्याचा निर्णय घेण्यात आला,’ असे प्रतिपादन वसंतराव मुळीक यांनी केले.

मराठा आरक्षणासाठी पहिले बलिदान देणारे अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक, अध्यक्ष स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या ८७ व्या जयंतीनिमित्त मराठा महासंघाच्या कार्यालयात वसंतराव मुळीक यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी शैलजा भोसले, संयोगीता देसाई, दिलीप देसाई, शशिकांत पाटील, शाहीर दिलीप सावंत, अनिल पाटील, प्रकाश पाटील, संदीप देसाई, शरद साळुंखे, महादेव पाटील, सचिन इंगवले, शिरीष जाधव, अवधूत पाटील आदी उपस्थित होते.