कोल्हापूर (प्रतिनिधी) : माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत सुरु असलेल्या सर्वेक्षणाला एनसीसी आणि एनएसएसच्या विदयार्थ्यांची साथ मिळाली आहे. त्यामुळे ही मोहिम अधिक गतीमान होण्यास निश्तिपणे मदत होईल असा विश्वास आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केला.

महानगरपालिकेच्या राजारामपूरी येथील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेतील सर्वेक्षणसाठी आरोग्य कर्मचारी आणि शिक्षकांच्या बरोबरीने शहाजी कॉलेजच्यावतीने एनएसएस आणि एनसीसी विदयार्थ्यांचे पथक उपलब्ध करुन दिले आहे. या उपक्रमाची सुरुवात आज आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी व उपमहापौर संजय मोहिते यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी परिवहन समिती सभापती सौ.प्रतिज्ञा उत्तुरे, नगरसेविका सौ. भाग्यश्री शेटके, वैदयकिय अधिकारी शोभा दाभाडे, शहाजी कॉलेजचे प्राध्यापक रमेश देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.