कोल्हापूर (प्रतिनिधी) : इंद्रजित फराक्टे (रा. कोल्हापूर) यांचे आज शिवाजी पेठ ते जुना वाशी नाक्यादरम्यान पाकिट हरवले होते. त्यामध्ये त्यांची महत्त्वाची कागदपत्रे आणि बहीणीच्या औषधोपचारासाठी ठेवलेली 14 हजारांची रक्कम गहाळ झाली. हे पाकिट कोल्हापूरात सीपीआर रुग्णालयात कर्मचारी असलेले किरण सराटे यांना सापडले.

त्यांनी पाकिटातील कागदपत्रावरून किरण सराटे यांनी फराक्टे यांच्याशी संपर्क साधला आणि प्रामाणिकपणे ते पाकिट परत केले. सध्या सुरु असलेल्या आर्थिक अडचणीच्या काळात सराटे यांच्या प्रामाणिकपणाचे खरच कौतुक करावे तितके थोडेच आहे.