लाचप्रकरणी फरारी असलेल्या उपनिरीक्षकासह कॉन्स्टेबलला अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मटका कारवाईमध्ये एका व्यक्तीला सहआरोपी न करण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच घेतली होती. तर फरारी झालेल्या राजारामपुरी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक अभिजीत शिवाजी गुरव आणि कॉन्स्टेबल रोहित राजेंद्र पोवार या दोघांना कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (सोमवार) रात्री अटक केली. याबाबतची अधिक माहिती अशी की, राजारामपुरी पोलीसांनी एका मटका… Continue reading लाचप्रकरणी फरारी असलेल्या उपनिरीक्षकासह कॉन्स्टेबलला अटक

टोप आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर : ग्रामपंचायतीची एकाकी झुंझ

टोप (प्रतिनिधी) : टोप येथे रुग्णांची संख्या रोजच वाढत आहे. हातकणंगले तालुक्यातील १६ हाँटस्पाँट गावातील टोप हे गाव आले आहे. गावात आता कोरोनाच्या रुग्णांचा आकडा शंभरी पार गेला आहे. असे असताना आरोग्य विभाग मात्र व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. याठिकाणी शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत टोप उपकेंद्रातील आरोग्य सेवकांचे काम गेली चार ते पाच महिने… Continue reading टोप आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर : ग्रामपंचायतीची एकाकी झुंझ

पोलिसांनी माझी, दाभोळे कुटुंबाची नार्को टेस्ट करावी : अनिल म्हमाणे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पोलिसांनी गुन्ह्याची शहनिशा करून माझ्यावर गुन्हा दाखल करावा. तसेच माजी आणि दाभोळे यांची कुटुंबाची नार्को टेस्ट करावी. त्यातून सत्य निष्पन्न होईल असे अनिल म्हमाणे यांनी आपले म्हणणे प्रसिद्धी पत्रकाद्वारे मांडले आहे. जगन्नाथ दाभोळे यांच्या पत्नीची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना एका  रुग्णालयांमध्ये दाखल केले होते. या दवाखान्याचे बिल दोन लाख  33 हजार रुपये झाले… Continue reading पोलिसांनी माझी, दाभोळे कुटुंबाची नार्को टेस्ट करावी : अनिल म्हमाणे

आयसोलेशन रुग्णालयात ऑक्सिजन जनरेटर बसवणार : पालकमंत्री

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गडहिंग्लज उप जिल्हा रुग्णालयाप्रमाणेच कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयसोलेशन रुग्णालयात १०० बेड क्षमतेचे ऑक्सिजन जनरेटर बसवण्याची सोय करण्यात येईल, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज (सोमवारी) सांगितले. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी विविध रुग्णालयातील आयसीयू आणि ऑक्सिजन बेडच्या नियोजनासंबंधी आयोजित बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, भविष्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढवण्याची शक्यता गृहित धरुन आरोग्य… Continue reading आयसोलेशन रुग्णालयात ऑक्सिजन जनरेटर बसवणार : पालकमंत्री

शियेमध्ये केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाचे स्वागत

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिये (ता. करवीर) येथे शेतकरी संघटनेच्या वतीने केंद्र सरकारने कृषीक्षेत्राशी संबंधित मंजूर केलेल्या विधेयकाचे साखर वाटप करून स्वागत करण्यात आले. अत्यावश्यक वस्तू कायद्यातून शेतमाल वगळणे, शेतकऱ्यांना देशाच्या कोणत्याही बाजारपेठेत शेतमाल विकण्याची मुभा देणे, आंतरराज्य शेतमाल विक्रीला परवानगी, व्यापारी आणि प्रक्रियादारांनासह रिटेल दुकानदारांना थेट शेतात जाऊन शेतमाल खरेदी करण्याची परवानगी देणे, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला… Continue reading शियेमध्ये केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाचे स्वागत

मराठा आरक्षणप्रश्नी हातकणंगलेत रास्ता रोको

हातकणंगले (प्रतिनिधी) : मराठा समाजाला ५८ क्रांती मोर्चे आणि अनेक आंदोलनानंतर तत्कालीन महाराष्ट्र सरकारने आरक्षण दिले. मात्र, या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. राज्य सरकारने ताबडतोब ठोस भूमिका जाहीर करावी. विद्यार्थ्यांचे व समाजाचे नुकसान थांबवावे या मागणीसाठी हातकणंगले तालुका सकल मराठा समाज समन्वय समितीच्या वतीने हातकणंगले येथे एसटी स्टँडजवळ कोल्हापूर-सांगली मार्गावर आज (सोमवार) तासभर रास्ता… Continue reading मराठा आरक्षणप्रश्नी हातकणंगलेत रास्ता रोको

प्रवेशद्वार सुशोभीकरणासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांचे निवेदन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर म्हणजे निसर्ग संपन्न असणारे ठिकाण. श्री अंबाबाई मंदिर, जोतीबा मंदिर, किल्ले पन्हाळा अशा विविध धार्मिक आणि ऐतिहासीक स्थळांची नगरी म्हणजे कोल्हापूर होय. बाहेरगावाहून येणाऱ्या प्रत्येकाला या शहराच्या वातावरणाची, निसर्ग संपदेची भुरळ पडली जाते. एखाद्या शहराच्या प्रवेशद्वारावरून त्या शहराचे वर्णन बाहेरगावाहून येणारे पर्यटक करत असतात. प्रवेशद्वार म्हणजे शहराचे नाकच म्हणावे लागेल. परंतु… Continue reading प्रवेशद्वार सुशोभीकरणासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांचे निवेदन

ऑक्सिजन पुरवठ्यासाठी दोन टँकर भाड्याने घ्यावेत : सतेज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील रुग्णालयांची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी आणि काही प्रमाणात उद्योगांनाही पुरवठा करण्यासाठी पुणे येथून ऑक्सिजन मागवणे आवश्यक आहे. त्यासाठी दोन टँकर भाड्याने घ्यावेत. त्यासाठीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे त्वरित पाठवावे, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज (सोमवार) दिली. ते येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील ऑक्सिजन उत्पादक, पुरवठादार आणि उद्योजकांसोबतच्या बैठकीत बोलत होते. पालकमंत्री पाटील… Continue reading ऑक्सिजन पुरवठ्यासाठी दोन टँकर भाड्याने घ्यावेत : सतेज पाटील

जमीन विक्रीस इच्छुकांनी संपर्क साधावा : बाळासाहेब कामत

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत समाज कल्याण कार्यालयास जमीन खरेदी करावयाची आहे. ज्या जमिन मालकास शासनाने निश्चित केलेल्या जमिनीच्या दरानुसार किंवा जिरायत जमिन कमान ५ लाख प्रति एकर व बागायत जमीन कमाल ८ लाख रूपये प्रति एकर प्रमाणे विक्री करावयाची आहे, अशांनी जमिनीच्या सात बारा आणि आवश्यक कागदपत्रासह सहाय्यक आयुक्त,… Continue reading जमीन विक्रीस इच्छुकांनी संपर्क साधावा : बाळासाहेब कामत

जिल्हातील गटसचिव म्हणजे जिल्हा बँकेच्या कुटुंबाचे सदस्यच : हसन मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक विकास सहकारी सेवा संस्थांचे गटसचिव हे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कुटुंबाचे सदस्यच आहेत. कोरोना महामारीत त्यांना विमासुरक्षा कवच देण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाने एकमताने ठराव मंजूर करावा, अशी सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एका पत्राद्वारे केली आहे. मंत्री मुश्रीफ यांनी संचालक मंडळाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, काही… Continue reading जिल्हातील गटसचिव म्हणजे जिल्हा बँकेच्या कुटुंबाचे सदस्यच : हसन मुश्रीफ

error: Content is protected !!