शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यामध्ये दरवर्षी महापुरामुळे अनेक गावे पाण्याखाली जातात. तर काही गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे कृष्णा, पंचगंगा,  वारणा, दुधगंगा काठच्या गावांमध्ये कोव्हिडचे लसीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. नदीकाठच्या जवळपास २८ गावांची पुरामुळे दळणवळण व्यवस्था कोलमडते. अशा पुरग्रस्त भागातील गावांमध्ये लसीकरण करावे, असे निवेदन आज (गुरुवार) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी आणि मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले.

यावेळी सागर शंभुशेटे, सचिन शिंदे, उत्तम माळी,  रामभाऊ शिंदे,  स्वप्नील चौगुले,  मायगोंडा पाटील,  भरत डके आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.