कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासांत १६११ जणांना कोरोनाची लागण झाली असून ३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १३४६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिका क्षेत्रात ३८६ तर करवीर तालुक्यात ३०१ रुग्ण आढळून आले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र३५१, आजरा- ४३, भुदरगड- ३८, चंदगड- ३०, गडहिंग्लज- ४८, गगनबावडा – ०, हातकणंगले – १७०, कागल- ६७करवीर- ३०१, पन्हाळा- ७५, राधानगरी- ७६, शाहूवाडी – ६६, शिरोळ – १४७, नगरपरिषद क्षेत्र- १११, इतर जिल्हा व राज्यातील- ३३ अशा १६११ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ७१, ४१० 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ५२, ८६९  

मृतांची संख्या, ९७५

उपचार सुरु असलेले रूग्ण१३,५६६