शिरोळ (प्रतिनिधी) : गोकुळ निवडणूकीमध्ये माजी खा. राजू शेट्टी, महाडिक गट तसेच भारतीय जनता पार्टीचे नेते एकत्र आले होते. हाच धागा पकडून माजी खा. धनंजय महाडिक जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाच्या पार्श्वभूमीवर माजी खा. राजू शेट्टी यांची शिरोळ येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन आज (गुरुवार) भेट घेत पाठिंब्याबाबत चर्चा केली. 

आज पुन्हा एकदा माजी खा. राजू शेट्टी यांच्या  निवासस्थानी महत्वाच्या विषयावर बैठक झाली असून या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.  येत्या काही महिन्यामध्ये नगरपालिका,  जिल्हा परिषद, लोकसभा, विधानसभेच्या निवडणूक विषयीची चर्चा झाली असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. राजू शेट्टी यांची या  भागामध्ये चांगलीच पकड असल्याने भारतीय जनता पार्टी, महाडिक गट यांच्यामध्ये या विषयी हालचाली सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.

या बैठकीला राजू शेट्टी,  धनंजय महाडिक,  सावकार मदनाईक, बजरंग खामकर, विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, रामचंद्र डांगे, अशोकराव माने, राजवर्धन नाईक-निंबाळकर, शीतल गतारे  उपस्थित होते.