जिल्ह्यातील १८ बंधारे पाण्याखाली : ‘राधानगरी’तून १३५० क्युसेकने विसर्ग

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील १८ बंधारे पाण्याखाली गेले असून राधानगरी धरणात १०८.७७  दलघमी पाणीसाठा आहे. आज (शनिवार) सकाळी ७ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार राधानगरी धरणातून १३५०  क्युसेकने विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील – शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ,  भोगावती नदीवरील- हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडग कोगे, कासारी नदीवरील-  यवलूज व ठाणे… Continue reading जिल्ह्यातील १८ बंधारे पाण्याखाली : ‘राधानगरी’तून १३५० क्युसेकने विसर्ग

मी ‘लंबी रेस का घोडा..! यामुळेच ‘त्या’ नेत्याने षडयंत्र केले : रविकिरण इंगवले

प्रतिनिधी (कोल्हापूर) : मी लंबी रेस का घोडा आहे, हे जाणवल्याने महाविकास आघाडीतील एका वरिष्ठ नेत्याने षडयंत्र केले. राजकारण करून माझे पंख कापण्याचे काम केले. पण मी डगमगणारा नाही. शिवसेनेशी एकनिष्ठ राहत सामाजिक कार्य पुढे सुरू ठेवणार असल्याचे रविकिरण इंगवले यांनी आज (शुक्रवारी) स्पष्ट केले आहे. शिवसेना पक्ष नेतृत्वाने गुरूवारी इंगवले यांना कोल्हापूर उत्तरच्या शहर… Continue reading मी ‘लंबी रेस का घोडा..! यामुळेच ‘त्या’ नेत्याने षडयंत्र केले : रविकिरण इंगवले

पन्हाळा नगरपरिषदेच्या विविध विकासकामांचे आ. विनय कोरे यांच्या हस्ते उद्घाटन…

पन्हाळा (प्रतिनिधी) :  किल्ले पन्हाळागड  येथील चार दरवाजा परीसरात नगरपरिषदेतर्फे सुशोभिकरणासाठी बसविण्यात आलेल्या अक्षरांचे अनावरण आ. डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते आज (शुक्रवार) करण्यात आले. तसेच पन्हाळ्यातील विविध विकासकामांचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. आ. कोरे म्हणाले की, पन्हाळा येथील सर्व नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम आणि शहरातील सूज्ञ नागरिकांच्या पाठबळामुळेच पन्हाळा नगरपरिषदेला स्वच्छ… Continue reading पन्हाळा नगरपरिषदेच्या विविध विकासकामांचे आ. विनय कोरे यांच्या हस्ते उद्घाटन…

कोरोना कालावधीतील दहावीचे गुण : वास्तव की आभासी ?

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दहावी शालांत परीक्षेला महाराष्ट्रातून साधारण १६, ५८, ६२४ विद्यार्थी बसले होते. आज दहावीचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीही निकालात मिळालेले गुण हे वास्तव की फुगवटा अशी चर्चा सुरू झाली. आज दहावीचा निकाल लागलेल्या विद्यार्थ्यांना कोरोनामुळे इयत्ता नववीची वार्षिक परीक्षाही देता आली नव्हती. त्यानंतर इयत्ता दहावीचे वर्ष ऑनलाइन एज्युकेशन आणि… Continue reading कोरोना कालावधीतील दहावीचे गुण : वास्तव की आभासी ?

जिल्ह्यात चोवीस तासात १८, ७२७ जणांची कोरोना चाचणी : १३५६ जण पॉझिटिव्ह

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासांत तब्बल १३५६ जणांना कोरोनाची लागण झाली असून २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १३५१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिका क्षेत्रात २११ तर करवीर तालुक्यात २७६ रुग्ण आढळून आले आहेत. तर १८, ७२७ जणांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र –… Continue reading जिल्ह्यात चोवीस तासात १८, ७२७ जणांची कोरोना चाचणी : १३५६ जण पॉझिटिव्ह

‘गोकुळ’कडून दूध खरेदीदरात वाढ म्हणजे दूध उत्पादकांच्या भावनेचा आदर

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघाने म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर २ रुपये व गायीच्या दुधाला १ रुपये खरेदी दरात वाढ करून दूध उत्पादकांना दिलासा देण्याबरोबरच त्यांच्या भावनेचा आदर केल्याची भावना विविध दूध संघांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली. आज (शुक्रवार) संघाच्या प्रकल्पस्थळी प्राथमिक दूध संस्थांमार्फत चेअरमन विश्वास पाटील यांचेसह संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. महादेव दूध संस्था, चांदे, दत्‍त… Continue reading ‘गोकुळ’कडून दूध खरेदीदरात वाढ म्हणजे दूध उत्पादकांच्या भावनेचा आदर

शहरातील कचऱ्याचे योग्य नियोजन करावे : ‘आप’चे आरोग्याधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरातील कचरा उठावाचा बोजवारा उडाला आहे. महापालिका क्षेत्रात मोजक्या कंटेनरच्या माध्यमातून कचरा उठाव सुरू आहे. त्यामधील अधिकतर कंटेनर फुटलेले आहेत. त्यामुळे शहरभर दुर्गंधी पसरली आहे. डेंग्यू, चिकनगुनिया सारखे आजार फोफावत आहेत. तर भटक्या कुत्र्यांचे साम्राज्यही वाढले आहे. यावर उपाययोजना कराव्यात अशी मागणी आपने प्रभारी आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.… Continue reading शहरातील कचऱ्याचे योग्य नियोजन करावे : ‘आप’चे आरोग्याधिकाऱ्यांना निवेदन

आरोग्य सेवेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे :  संजय पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आरोग्य विभागातील टी.बी.(एनटीईपी) विभाग तसेच सर्व कंत्राटी कर्मचारी हे गेले १५ ते २० वर्षे अत्यल्प तुटपुंज्या मानधनावर करार तत्वावर काम करीत आहेत. त्यांना कायम कर्मचाऱ्यांसारख्या सेवा-सुविधा मिळत नाही. पण काम मात्र समान करावे लागते. या कर्मचाऱ्यांना कायम करावे. अशी मागणी कोल्हापूर जिल्हा क्षयरोग नियंत्रण कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी आरोग्य मंत्री… Continue reading आरोग्य सेवेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे :  संजय पाटील

जोगेवाडी-धनगरवाड्यावरील रस्त्यासाठी २५ लाखांचा निधी मंजूर…

कडगांव (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील वासनोली पैकी जोगेवाडी -धनगरवाड्याचा प्रश्न प्रलंबीत होता. गेल्या महिन्यात येथील संगिता फटकारे यांना प्रसूतीसाठी पाळणा करुन नेत असताना वाटेतच प्रसूती झाल्याची घटना घडली होती. त्यामूळे या रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या घटनेची तक्रार मानवाधिकार आयोगाकडे देखील झाली होती. यासाठीचा पाठपुरावा लोकप्रतिनिधींकडे सुरू होता. यासाठी भुदरगड तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे समन्वयक… Continue reading जोगेवाडी-धनगरवाड्यावरील रस्त्यासाठी २५ लाखांचा निधी मंजूर…

दुकाने खुली करण्याबाबत आरोग्यमंत्र्यांचे ‘जर…तर…’

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना रुग्णांच्या संख्या आणि मृत्युदरात वाढ झाल्याची गंभीर दखल घेऊन परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे आज (शुक्रवार) कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. व्यापारी संघटनांनी त्यांची भेट घेऊन सर्व दुकाने खुली करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केली. राज्य शासन याबाबत सकारात्मक असून जर पॉझिटिव्हिटी रेट कमी आला तर दुकाने खुली करण्यास परवानगी देता… Continue reading दुकाने खुली करण्याबाबत आरोग्यमंत्र्यांचे ‘जर…तर…’

error: Content is protected !!