मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात १० हजार किमीचे रस्ते : ग्रामविकासमंत्री

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  राज्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात १० हजार किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली १५ डिसेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. ना. मुश्रीफ म्हणाले की, राज्यात २०२४ अखेर ४० हजार किमीच्या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात… Continue reading मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात १० हजार किमीचे रस्ते : ग्रामविकासमंत्री

भाजपाकडून पन्हाळा नगरपरिषदेसाठी निवडणूक प्रभारी म्हणून अमरसिंह भोसले यांची निवड…

पन्हाळा (प्रतिनिधी) : कोल्हापूर भाजपा, जिल्हा ग्रामीण पन्हाळा नगरपालिका (२०२२) निवडणूक प्रभारीपदी अमरसिंह भोसले यांची निवड करण्यात आली. तसेच पन्हाळा तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी प्रभारी म्हणून सुरेश बेनाडे यांची निवड करण्यात आली. यावेळी समरजितसिंह घाटगे, धनंजय महाडिक, अमल महाडिक, सुरेश हाळवणकर, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल पाटील, तालुकाध्यक्ष सचिन शिपुगडे उपस्थित होते.

जिल्ह्यातील नदीपात्रातील अतिवृष्टीमुळे साठलेला गाळ काढावा : खा. धैर्यशील मानेंची मागणी   

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अतिवृष्टीमुळे कोल्हापुर जिल्ह्यातील नदीपात्रात गाळ साठला आहे. हा गाळ काढण्यासंदर्भात शासकीय यंत्रणेची बैठक बोलविण्यात यावी. असे निवेदन खा. धैर्यशील माने यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना दिले. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या चार वर्षांपासून होणाऱ्या अतिवृष्टीमुळे वारणा, पंचगंगा, कृष्णा आणि कडवी नद्यांसह कोल्हापुर जिल्ह्यामधील इतर नदीपात्रांच्या पाणलोट क्षेत्रात गाळ तयार झालेला आहे. तो… Continue reading जिल्ह्यातील नदीपात्रातील अतिवृष्टीमुळे साठलेला गाळ काढावा : खा. धैर्यशील मानेंची मागणी   

तांत्रिक अडचणी दूर करून आखरी रस्त्याचे काम मार्गी लावा : कृती समिती    

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गंगावेश ते शिवाजी पूल आखरी रास्ता कामातील तांत्रिक अडचणी दूर करून त्वरीत रस्ता पूर्ण करावा. तर या कामाची जबाबदारी  पालकमंत्री सतेज पाटील यांनी घेऊन आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांची संयुक्त बैठक घेऊन त्वरीत मार्ग काढावा. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी दयावा, अशी मागणी आखरी रास्ता कृती समितीच्या वतीने प्रसिद्धी… Continue reading तांत्रिक अडचणी दूर करून आखरी रस्त्याचे काम मार्गी लावा : कृती समिती    

ऊसतोड मजुरांसाठी लसीकरण मोहीम राबवा : अमल महाडिक  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ऊस तोडणी मजुरांसाठी कारखाना कार्यक्षेत्रावर कोरोना लसीकरण मोहीम राबवावी अथवा कॅम्प आयोजित करावा. तसेच मजुरांच्या १५ ते १८ वयोगटातील मुलांना लसीकरण तर मजुरांना आवश्यकतेनुसार बूस्टर डोस उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माजी आ. अमल महाडिक यांनी आज (मंगळवार) केली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून कोव्हिड… Continue reading ऊसतोड मजुरांसाठी लसीकरण मोहीम राबवा : अमल महाडिक  

आजरा तालुक्यातील सातेरी दूध संस्थेत सत्तांतर.…

आजरा (प्रतिनिधी) : कोवाडे (ता.आजरा) येथील सातेरी सहकारी दूध संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सातेरी परिवर्तन पॅनेलने सत्तांतर घडवीत ३० वर्षांची सत्ता संपुष्टात आणली. या पॅनेलने १० जागा जिंकत सत्तांतर केले. तर विरोधी विठ्ठल-रुक्मिणी आघाडीला बिनविरोध १ जागेवर समाधान मानावे लागले. निवडणुकीत सत्ताधारी विठ्ठल-रुक्मिणी आघाडीचे भटक्या विमुक्त जाती जमातीमधील राखीव मोहन गोंधळी तर सातेरी परिवर्तन आघाडीचे अनुसुचित… Continue reading आजरा तालुक्यातील सातेरी दूध संस्थेत सत्तांतर.…

जातिवाचक शिवीगाळ, मारहाण प्रकरणी पुलाची शिरोलीतील चौदा जणांविरुद्ध गुन्हा दाखल…

टोप (प्रतिनिधी) : शिरोली येथे शेतजमिनीच्या वादातून एकाला धमकावणे, जातीवाचक शिवीगाळ करणे आणि मारहाण करणे अशा विविध गुन्ह्यांमध्ये पुलाची शिरोली येथील सुमारे चौदा जणांविरुद्ध शिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये सुनील रंगराव पाटील, अनिल रंगराव पाटील, श्रेयस सुनील पाटील, आदित्य पंडित पाटील, शिवेंद्र पंडित पाटील, संभाजी गायकवाड व त्यांच्या सोबत असणारे आठ अनोळखी… Continue reading जातिवाचक शिवीगाळ, मारहाण प्रकरणी पुलाची शिरोलीतील चौदा जणांविरुद्ध गुन्हा दाखल…

‘त्या’ लाचखोर प्रांताधिकारी, सरपंचाला दोन दिवसांची पोलीस कोठडी…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील तक्रारदाराकडून स्टोन क्रेशर व्यवसायावरील कारवाई टाळण्यासाठी ११ लाखांची मागणी करुन साडेपाच लाखांची लाच घेताना फराळे येथील सरपंच संदीप डवर आणि प्रांताधिकारी प्रसेनजीत प्रधान यांना काल अटक केली होती. आज (सोमवार) त्या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.  राधानगरी तालुक्यातील क्रशर स्टोन व्यवसायावरील कारवाई टाळण्यासाठी तक्रारदाराकडून… Continue reading ‘त्या’ लाचखोर प्रांताधिकारी, सरपंचाला दोन दिवसांची पोलीस कोठडी…

जिल्ह्यात चोवीस तासात १८५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात १८५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात मृत्यू निरंक झाले असून ५३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – १३१, आजरा – २, भुदरगड – ०, चंदगड – ०, गडहिंग्लज – २, गगनबावडा – ०, हातकणंगले – ५, कागल – ०,  करवीर… Continue reading जिल्ह्यात चोवीस तासात १८५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…

उचंगी प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न समन्वयाने सोडवू : ना. हसन मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : उचंगी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या समन्वयाने सोडवूया, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण होऊन यावर्षी घळभरणी होऊन, पाणी अडविले जावे, ही येथील शेतकऱ्यांची भावना असल्याचे ते म्हणाले. उचंगी प्रकल्पग्रस्तांच्या व प्रशासनातील अधिकारी यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अप्पर… Continue reading उचंगी प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न समन्वयाने सोडवू : ना. हसन मुश्रीफ

error: Content is protected !!