जिल्ह्यात चोवीस तासात १८५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात १८५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात मृत्यू निरंक झाले असून ५३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – १३१, आजरा – २, भुदरगड – ०, चंदगड – ०, गडहिंग्लज – २, गगनबावडा – ०, हातकणंगले – ५, कागल – ०,  करवीर… Continue reading जिल्ह्यात चोवीस तासात १८५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…

उचंगी प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न समन्वयाने सोडवू : ना. हसन मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : उचंगी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या समन्वयाने सोडवूया, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण होऊन यावर्षी घळभरणी होऊन, पाणी अडविले जावे, ही येथील शेतकऱ्यांची भावना असल्याचे ते म्हणाले. उचंगी प्रकल्पग्रस्तांच्या व प्रशासनातील अधिकारी यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अप्पर… Continue reading उचंगी प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न समन्वयाने सोडवू : ना. हसन मुश्रीफ

कुरुंदवाडमध्ये विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई…

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाड शहरात आज (सोमवार) पासून मुख्याधिकारी निखिल जाधव आणि कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे सपोनि. अमित पाटील यांनी कर्मचाऱ्यांना घेऊन शहरातील चौकात विनामास्क फिरणाऱ्यांना अडवून पाचशे रुपये दंड ठोठावण्यात सुरुवात केली. त्यामुळे कुरुंदवाड आणि परिसरातील विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांच्यात खळबळ उडाली. गेल्या आठ दिवसांपासून कोरोनाच्या नियमांचे पालन करावे असे प्रशासनाकडून आवाहन करत होते. काही महाविद्यालयीन… Continue reading कुरुंदवाडमध्ये विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई…

स्व. आ. चंद्रकांत जाधव संपर्क कार्यालयात ‘ई-श्रम कार्ड’ची मोफत नोंदणी सुरू…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जनसंपर्क कार्यालय हे सर्वसामान्य जनतेचे सेवा केंद्र ठरावे यासाठी स्व. आमदार चंद्रकांत जाधव शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत होते. त्यामुळे शहरातील प्रत्येक घटकाची कामे मार्गी लावता यावीत, यासाठी हे कार्यालय कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी सरकारच्या ई-श्रम कार्डची  मोफत नोंदणी जनसंपर्क कार्यालयात सुरू केली आहे. नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे… Continue reading स्व. आ. चंद्रकांत जाधव संपर्क कार्यालयात ‘ई-श्रम कार्ड’ची मोफत नोंदणी सुरू…

मदर तेरेसा यांचा विचार आपल्या घरात, समाजात रुजवावा : जयभानू शेखर

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : मदर तेरेसा यांनी आयुष्याच्या अंतिम श्वासापर्यंत चांगल्या आचार आणि विचारांचा प्रसार समाजासाठी केला. म्हणून साऱ्या जगाने त्यांना आदर्शस्थान मानत त्यांचा आदर केला. आपले घर आणि समाजातही हा विचार रुजवावा. त्यामुळे कुटुंबातील सदस्य आणि लोक तुमचा आदर्श घेतील. असे प्रतिपादन प्रवचनकार प.पू मुनिराज जयभानु शेखर यांनी केले. ते कुरुंदवाड येथे जैन श्वेतांबर मंदीरात… Continue reading मदर तेरेसा यांचा विचार आपल्या घरात, समाजात रुजवावा : जयभानू शेखर

वन मजुरांना चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याच्या नोटीसा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘लाईव्ह मराठी’ने वन विभागातील वन मजुरांच्या घोटाळ्यासंदर्भात बातमी प्रसिद्ध केल्यानंतर वनविभागात खळबळ उडाली आहे. या संदर्भात नुकतेच यातील तक्रारदारांना आणि कांही वन मजुरांना चौकशी समितीचे अधिकारी कांबळे यांनी आपल्या कार्यालयात चौकशीकामी हजर राहण्याच्या नोटिसा पाठवल्या आहेत. मात्र अशिक्षित आणि गरजू वन मजुरांना आपल्या कार्यालयात बोलवून चौकशीचा सोपस्कार पूर्ण करण्यापेक्षा या अधिकाऱ्यांनी अर्जातील… Continue reading वन मजुरांना चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याच्या नोटीसा…

प्रांताधिकारी प्रसेनजीत प्रधान याच्या घरातून नऊ लाखांची बेहिशेबी रक्कम जप्त…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्टोन क्रेशर व्यवसायावरील कारवाई टाळण्यासाठी ११ लाखांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाच घेताना राधानगरी तालुक्यातील फराळे येथील सरपंच संदीप डवर आणि प्रांताधिकारी प्रसेनजीत प्रधान यांना आज (रविवार) ताब्यात घेण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी प्रधान यांच्या घराची (रा. प्लॉट नं. ३०३, सी विंग, विंड गेट अपार्टमेंट, न्यू पॅलेस, कोल्हापूर) इथे पोलीसांनी झाडाझडती घेतली.… Continue reading प्रांताधिकारी प्रसेनजीत प्रधान याच्या घरातून नऊ लाखांची बेहिशेबी रक्कम जप्त…

या ‘दोन’ मोक्कातंर्गत गुन्हेगारांच्या मालमत्तेवर न्यायालयाची मनाई…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मोक्का अंतर्गत कारवाई झालेला मटका किंग सम्राट सुभाष कोराणे याची २९ कोटी आणि इचलकरंजीतील नगरसेवक संजय तेलनाडे आणि सुनील तेलनाडे या दोघा भावांच्या १७ कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेवर न्यायालयाने मनाई आणली आहे. न्यायालयाने यांच्या मालमत्तांच्या खरेदी-विक्री व्यवहारास मनाई केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी दिली.  

केडीसीसी बँकेच्या विजयी उमेदवारांच्या मिरवणुकांवरती गुन्हे दाखल…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतमोजणी नंतर विजयी उमेदवार आणि त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मिरवणूक काढण्यास परवानगी दिली नव्हती. तरीही जिल्ह्यातील जयसिंगपूर, वडगाव आणि शाहूवाडी या ठिकाणी विजयी मिरवणूक काढल्याबद्दल गुन्हे दाखल केलेले आहेत. जयसिंगपूर येथील क्रांती चौकामध्ये जेसीबीने गुलालाची उधळण करून कोविडच्या नियमांचे पालन न केल्याबद्दल जयसिंगपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद… Continue reading केडीसीसी बँकेच्या विजयी उमेदवारांच्या मिरवणुकांवरती गुन्हे दाखल…

कोल्हापूरसह जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्येत वाढ  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात २२३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात मृत्यू निरंक झाले असून १३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – १४२, आजरा – १, भुदरगड – ५, चंदगड – १, गडहिंग्लज – ४, गगनबावडा – १, हातकणंगले – ८, कागल – ०,  करवीर… Continue reading कोल्हापूरसह जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्येत वाढ  

error: Content is protected !!