कोरोनाच्या निर्बंधामुळे क्रीडा क्षेत्रावर परिणाम : स्पोर्ट्स पेरेंट्स असोशिएन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यात कोरोना आणि ओमायक्रोनला कंट्रोल करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुन्हा एकदा कडक निर्बंध लादले आहेत. याचा सर्वात जास्त फटका क्रीडा क्षेत्राला बसत आहे. गेल्या तीन वर्षांपासून शासनाने जेंव्हाजेंव्हा निर्बंध कडक केले तेव्हा तेव्हा क्रीडा क्षेत्र पूर्णपणे बंद केले आहे. तरी शासनाने पन्नास टक्के क्षमतेने जे खेळ बॉडी कॉन्टॅक्टमध्ये नाहीत त्या खेळांना किमान परवानगी… Continue reading कोरोनाच्या निर्बंधामुळे क्रीडा क्षेत्रावर परिणाम : स्पोर्ट्स पेरेंट्स असोशिएन

मारहाण प्रकरणी गोकुळच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  आंदोलनात भाषण करताना नेत्यांचा एकेरी शब्दात उल्लेख केल्याचा जाब विचारात एकाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी गोकुळच्या संचालकांसह सहा जणांविरोधात गगनबावडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. यामध्ये गोकुळचे संचालक बयाजी शेळके, सहदेव कांबळे, शिवाजी राऊत, निलेश म्हाळुंगेकर, सूर्यकांत पडवळ, तुकाराम पाटील अशी त्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद गगनबावडा तालुक्यातील मणदूर येथील ज्ञानदेव बापू… Continue reading मारहाण प्रकरणी गोकुळच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल…

गारगोटी एसटी आगाराच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या…

गारगोटी (प्रतिनिधी) :   गेल्या दोन महिन्यांपासून एस टी कर्मचाऱ्यांचा संपामध्ये भाग घेतलेल्या कामगारांना चार दिवसांपूर्वी एसटी प्रशासनाने कारवाईची नोटीस दिल्या आहेत. यामुळे आलेल्या नैराश्येतून गारगोटी आगाराच्या एसटी चालकाने घरी गळफास लावून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. धनाजी मल्हारी वायदंडे (वय ३९ रा. नाधवडे, ता. भुदरगड) असे या चालकाचे नाव आहे. जोपर्यंत बसस्थानक प्रमुखावर मनुष्यवधाचा गुन्हा… Continue reading गारगोटी एसटी आगाराच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या…

हेर्ले येथील वृद्धाच्या खूनप्रकरणी चार जणांना सात वर्षांची सक्तमजुरी…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील हेर्ले येथे २२ फेब्रुवारी २०१० रोजी शेत जमिनीच्या वादातून झालेल्या माराहणीत इलाई उमर जमादार (वय ६०) असे यामध्ये मयत झालेल्या वृद्धाचे नाव आहे.  या खूनप्रकरणी आज (मंगळवार) जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.जी.भोसले यांनी चार आरोपींना सात वर्षे सक्तमजुरी आणि ३ हजार ५०० रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. यामध्ये लियाकत युसुफ जमादार… Continue reading हेर्ले येथील वृद्धाच्या खूनप्रकरणी चार जणांना सात वर्षांची सक्तमजुरी…

आजरा येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या…

आजरा (प्रतिनिधी) : आजरा येथील साई कॉलनी येथे राहणारा अझरुद्दीन अब्दुल अजीज राजगुरू (वय ३३) या तरुणाने राहत्या घरी स्लॅबच्या हुकाला दोरी लावून गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आज (मंगळवार) घडला. अझरुद्दीन याने आत्महत्या सोमवारी रात्री केली असल्याचे घटनास्थळावरील माहितीवरून समजते. सोमवारपासून हा तरुण तणावाखाली होता. हा प्रकार समजताच त्याचा मित्र परिवार, नागरिक साईनगर… Continue reading आजरा येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अभ्यागत भेटी रद्द…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोव्हिड प्रतिबंधाच्या दृष्टीने ११ जानेवारी पासून पुढील आदेशापर्यंत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अभ्यागत भेटी रद्द करण्यात आल्या आहेत. शासनाच्या निर्देशांनुसार जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे कोणत्याही अभ्यागतास पुढील आदेशापर्यंत विशेष लेखी परवानगी शिवाय प्रवेश दिला जाणार नाही. तथापि, अत्यावश्यक बाबीकरीता अभ्यागतांनी collectorkolhapur@gmail.com या ईमेल वर अर्ज पाठवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात… Continue reading कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अभ्यागत भेटी रद्द…

कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पालिकेची दंडात्मक कारवाई…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरामध्ये विनामास्क फिरणाऱ्या ४२ नागरीकांकडून १६ हजार, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्या 4 नागरीकांकडून ४ हजार, सोशल डिस्टंन्स न पाळणाऱ्या ४ नागरीकांकडून ४ हजार व सोशल डिस्टंन्स न पाळणाऱ्या २ आस्थापनांकडून १५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. महापालिकेच्या सात भरारी पथकामार्फत शहरात कारवाई करुन ४२ नागरीकांच्याकडून २५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल… Continue reading कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पालिकेची दंडात्मक कारवाई…

जिल्ह्यात चोवीस तासात २२४ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात २२४ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात १ चा मृत्यू झाला असून २८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – १४०, आजरा – ३, भुदरगड – १, चंदगड – ०, गडहिंग्लज – ९, गगनबावडा – ०, हातकणंगले – १७, कागल – २, … Continue reading जिल्ह्यात चोवीस तासात २२४ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…

‘शाहू साखर कारखान्या’च्या कामगारांना १२ टक्के वेतनवाढ : सुहासिनीदेवी घाटगे

कागल (प्रतिनिधी) : येथील श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना त्रिपक्षीय समितीने जाहीर केलेली १२ टक्के वेतनवाढ डिसेंबर २०२१ च्या पगारापासून लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय शाहूच्या व्यवस्थापनाने घेतला आहे, अशी माहिती कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे यांनी दिली. यावेळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, कारखान्याचे व्हा. चेअरमन अमरसिंह घोरपडे, संचालक मंडळ, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण,… Continue reading ‘शाहू साखर कारखान्या’च्या कामगारांना १२ टक्के वेतनवाढ : सुहासिनीदेवी घाटगे

‘या’ जागा सात दिवसात पालिकेच्या ताब्यात द्याव्यात : निखील जाधव

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाड पालिकेच्या मालकीच्या भुईभाडयाने दिलेल्या जागांची मुदत संपली आहे. या जागा सात दिवसात पालिकेच्या ताब्यात द्यावी. अन्यथा पालिका प्रशासन कारवाई करून जागा ताब्यात घेणार असल्याची नोटीस पालिकेच्या जागेवर वास्तव करत असलेल्या अतिक्रमणधारकाना प्रशासक निखिल जाधव यांनी बजावली आहे. नोटिसमध्ये म्हटले आहे की, पालिकेतर्फे आपणाला या ठिकाणी ठराविक मुदतीने भुईभाडयाने जागा मंजूर केलेल्या… Continue reading ‘या’ जागा सात दिवसात पालिकेच्या ताब्यात द्याव्यात : निखील जाधव

error: Content is protected !!