बोरपाडळे आरोग्यवर्धिनी परिक्षेत्रातील १७ पथकांमार्फत ४० टक्के सर्वेक्षण

बोरपाडळे (प्रतिनिधी) : बोरपाडळे आरोग्यवर्धिनी अंतर्गत कार्यरत कोरोना सर्वेक्षण १७ पथकाचे काम समाधानकारक असून सुमारे ४० टक्के सर्वेक्षण झाले आहे. पथकांनी स्वतःची काळजी घेत काळजीपूर्वक तपासणी करत सर्वेक्षण माहिती मोबाईल अॅपवर भरण्याचे आवाहन पन्हाळा तहसीलदार रमेश शेडगे यांनी केले. ते बोरपाडळे येथील जय मल्हार सभाग्रहामध्ये १५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर दरम्यान होत असलेल्या विशेष कोरोना… Continue reading बोरपाडळे आरोग्यवर्धिनी परिक्षेत्रातील १७ पथकांमार्फत ४० टक्के सर्वेक्षण

तामगावच्या वेदांत कंपनीकडून कोविड सुरक्षा साहित्य आयुक्तांकडे सुपूर्द

कोल्हापूर (प्रतिनिधी) : तामगांव येथील वेदांत टूल्स प्रा. लिमिटेडच्यावतीने सामाजिक बांधिलकी म्हणून ६ हजार एन-९५ मास्क, ४ हजार ८०० हातमोजे आणि १०० पीपीई किट असे कोविड-१९ सुरक्षा साहित्य आज (बुधवार) महापालिका आयुक्त डॉ. मलिलनाथ कलशेट्टी यांच्याकडे सुपूर्द केले. तामगांव येथील वेदांत टूल्स प्रा.लिमिटेडचे मॅनेजिक डायरेक्टर दत्तात्रय देसाई यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्यावतीने कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेसाठी सामाजिक… Continue reading तामगावच्या वेदांत कंपनीकडून कोविड सुरक्षा साहित्य आयुक्तांकडे सुपूर्द

लोकप्रतिनिधींचा सहभाग महत्वाचा : तहसिलदार शीतल मुळे-भामरे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सरकारच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम करवीर तालुक्यात प्रभावीपणे राबवण्यात येईल. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लोकप्रतिनिधींनी या मोहिमेत पुढाकार घ्यावा. लोकप्रतिनिधी आपल्या गावात मोहिमेची प्रचार, प्रसिद्धी करुन गावकऱ्यांचे प्रबोधन करावे, असे आवाहन तहसिलदार शीतल मुळे-भामरे यांनी केले. यावेळी त्यांनीउजळाईवाडी येथे भेट देऊन आरोग्य पथकामार्फत सुरु असलेल्या तपासणीत सहभाग घेतला. तहसिलदार म्हणाल्या की,… Continue reading लोकप्रतिनिधींचा सहभाग महत्वाचा : तहसिलदार शीतल मुळे-भामरे

विश्ववती आयुर्वेदिकच्या औषधांना शासनाची मान्यता

कोल्हापूर (प्रतिनिधी) : श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय आणि रिर्सच सेंटरशी संलग्न संस्था आहे. चिकित्सालयातर्फे कोरोना महामारीच्या सुरवातीच्या काळात माधव रसायन आणि रस माधव वटीच्या निर्मिती प्रक्रियेस सुरवात केली. सद्गुरू आनंदनाथ महाराजांच्या संकल्पनेतून आणि वैद्य समीर जमदग्नी यांच्या मार्गदर्शनातून श्री विश्ववती आयुर्वेद चिकित्सालय व संशोधन केंद्र, कोल्हापुरात ही वटीच्या निर्मितीची… Continue reading विश्ववती आयुर्वेदिकच्या औषधांना शासनाची मान्यता

‘एकटी’ संस्थेच्या बेघर महिलांनी बनविलेले मास्क पोलिसांना भेट

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या काळामध्ये पोलिसांचे खूप मोलाचे योगदान आहे. त्यामुळे ‘एकटी’ संस्थेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या बेघर निवाऱ्यामार्फत पोलिसांना मास्क देण्यात आले. पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून मास्क आणि आभाराचे पत्र पोलिसांना देण्यात आले आहेत. यात जुना राजवाडा, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी या पोलीस स्टेशनना एकटी संस्थेतर्फे मास्क देण्यात आले. महानगरपालिका आणि एकटी संस्था यांच्या संयुक्त… Continue reading ‘एकटी’ संस्थेच्या बेघर महिलांनी बनविलेले मास्क पोलिसांना भेट

विना मास्क ५२ जणांना दंड

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कुरुंदवाड नगरपरिषदेने विना मास्क फिरणाऱ्या ५२ जणांकडून ८ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. आजअखेर विना मास्क फिरणाऱ्या १७७६ व्यक्तींकडून १ लाख ५१ हजार ६०० रुपये दंडाची वसुली करण्यात आली आहे. जयसिंगपूर नगरपरिषदेने विना मास्क फिरणाऱ्या १२ जणांकडून २ हजार ३७० रुपयांचा दंड वसूल केला आहे. आजअखेर १३१६ व्यक्तींकडून १ लाख… Continue reading विना मास्क ५२ जणांना दंड

गगनबावड्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत कोविड सेंटर उभारावे : शेतकऱ्यांची मागणी

साळवण (संभाजी सुतार) : कोरोनाचा संसर्ग शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे भागातील शेतकऱ्यांचा विचार करून तालुक्यातील निवडे येथील महालक्ष्मी विकास सेवा संस्थेमार्फत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक ए. डी. माने यांना भेटून शेतकऱ्यांसाठी बँकेमार्फत कोविड सेंटर उभे करावे, किंवा बँकेमार्फत प्रत्येक तालुक्याला व्हेंटिलेटर बेड द्यावेत, असे संस्थेचे व्हाईस चेअरमन… Continue reading गगनबावड्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत कोविड सेंटर उभारावे : शेतकऱ्यांची मागणी

आज दिवसभरात 8,125 कुटुंबाचे सर्व्हेक्षण : डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत आज (मंगळवार) दिवसभरात 8125 घरांचे आणि 36,461 नागरीकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. संदर्भित केलेल्या 122 रुग्णांपैकी 15 जण कोरोना पॉझिटिव्ह तर सारीचे 27 रूग्ण आढळले असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आज (मंगळवार) दिली.  माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत संपूर्ण शहरात सुरु असलेल्या सर्व्हेक्षणामध्ये आज 143 जणांचे स्वॅब… Continue reading आज दिवसभरात 8,125 कुटुंबाचे सर्व्हेक्षण : डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी

जिल्ह्यात मागील चोवीस तासात ४७३ नव्या कोरोनाबाधितांची भर ; ६३२ जण कोरोनामुक्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल (सोमवार) सायंकाळी ५ पासून आज (मंगळवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात ४७३ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. तर २७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात ६३२ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच २३४१ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज रात्री ८ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार,… Continue reading जिल्ह्यात मागील चोवीस तासात ४७३ नव्या कोरोनाबाधितांची भर ; ६३२ जण कोरोनामुक्त

कोरोनामुळे जिल्हा बँकेच्या मृत्यू पावलेल्या अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आधार : मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मृत्यू पावलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी बँक पहाडासारखी उभी आहे,  असा विश्वास  बँकेचे अध्यक्ष आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. कोरोनाग्रस्त होऊन बरे झालेल्या कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या हॉस्पिटलचा खर्च बँक देणार असल्याचेही, त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. कोल्हापुरातील खाजगी दवाखान्यात कोरोनावर उपचार घेत असलेल्या मंत्री… Continue reading कोरोनामुळे जिल्हा बँकेच्या मृत्यू पावलेल्या अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आधार : मंत्री हसन मुश्रीफ

error: Content is protected !!