‘रेमडेसिवीर’चा घोळ आणि बरंच काही… (व्हिडिओ)

कोरोना संकटात रुग्णांच्या जीवाशी चाललेला खेळ, प्रशासनाची बोटचेपी भूमिका यासह विविध विषयांना वाचा फोडणारी रोखठोक मुलाखत…

‘त्यांच्यावर’ दंडात्मक कारवाई करण्यात येईल

टोप (प्रतिनिधी) : शिरोली येथे कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच क्वारंटाईन व्यक्ती बाहेर फिरताना दिसत आहेत. यावर आवर घालण्यासाठी त्यांच्यावर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच शशिकांत खवरे यांनी दिली. गावात कोरोनाग्रस्तांची संख्या तीनशेच्या जवळ गेली आहे. यामुळे अधिक धोका निर्माण झाला असून या कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी ग्रामपंचायतीकडून विविध उपाययोजना करण्यात… Continue reading ‘त्यांच्यावर’ दंडात्मक कारवाई करण्यात येईल

कोल्हापुर जिल्ह्यात चोवीस तासात ४६१ जण कोरोनाबाधित : ७८८  कोरोनामुक्त 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (सोमवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात ४६१ जण कोरोनाबाधित सापडले आहेत. तर दिवसभरात ७८८ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, चोवीस तासात तब्बल २१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर  ११६९ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज रात्री ९ वा.… Continue reading कोल्हापुर जिल्ह्यात चोवीस तासात ४६१ जण कोरोनाबाधित : ७८८  कोरोनामुक्त 

टोप आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर : ग्रामपंचायतीची एकाकी झुंझ

टोप (प्रतिनिधी) : टोप येथे रुग्णांची संख्या रोजच वाढत आहे. हातकणंगले तालुक्यातील १६ हाँटस्पाँट गावातील टोप हे गाव आले आहे. गावात आता कोरोनाच्या रुग्णांचा आकडा शंभरी पार गेला आहे. असे असताना आरोग्य विभाग मात्र व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. याठिकाणी शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत टोप उपकेंद्रातील आरोग्य सेवकांचे काम गेली चार ते पाच महिने… Continue reading टोप आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर : ग्रामपंचायतीची एकाकी झुंझ

आयसोलेशन रुग्णालयात ऑक्सिजन जनरेटर बसवणार : पालकमंत्री

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गडहिंग्लज उप जिल्हा रुग्णालयाप्रमाणेच कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयसोलेशन रुग्णालयात १०० बेड क्षमतेचे ऑक्सिजन जनरेटर बसवण्याची सोय करण्यात येईल, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज (सोमवारी) सांगितले. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी विविध रुग्णालयातील आयसीयू आणि ऑक्सिजन बेडच्या नियोजनासंबंधी आयोजित बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, भविष्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढवण्याची शक्यता गृहित धरुन आरोग्य… Continue reading आयसोलेशन रुग्णालयात ऑक्सिजन जनरेटर बसवणार : पालकमंत्री

ऑक्सिजन पुरवठ्यासाठी दोन टँकर भाड्याने घ्यावेत : सतेज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील रुग्णालयांची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी आणि काही प्रमाणात उद्योगांनाही पुरवठा करण्यासाठी पुणे येथून ऑक्सिजन मागवणे आवश्यक आहे. त्यासाठी दोन टँकर भाड्याने घ्यावेत. त्यासाठीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे त्वरित पाठवावे, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज (सोमवार) दिली. ते येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील ऑक्सिजन उत्पादक, पुरवठादार आणि उद्योजकांसोबतच्या बैठकीत बोलत होते. पालकमंत्री पाटील… Continue reading ऑक्सिजन पुरवठ्यासाठी दोन टँकर भाड्याने घ्यावेत : सतेज पाटील

टोपमध्ये कोरोनाची शंभरी पार

टोप (प्रतिनिधी): टोप गावात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून आता कोरोनारुग्णसंख्येने शंभरी पार केली आहे. दररोज दोन -तीन रुग्ण सापडत असल्याने गावात चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ग्रामपंचायत तसेच दक्षता समिती वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे .लोकांनीही नियम पाळणे गरजेचे आहे पण दुर्दैवाने असे होताना दिसत नाही. गावात रुग्णांचा आकडा वाढत असताना काही नागरीक… Continue reading टोपमध्ये कोरोनाची शंभरी पार

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात तब्बल ३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (रविवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात तब्बल 36 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर नव्या ४९३ कोरोना रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान, दिवसभरात ६२९ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १६०५ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज रात्री ८ वा… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात तब्बल ३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

दुधाळी पॅव्हेलियन येथे ५० बेडचे कोविड सेंटर : आयुक्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दुधाळी पॅव्हेलियन येथे नवीन कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. या कोविड केअर सेंटरच्या उभारणीच्या कामाची आयुक्तांनी पाहणी केली. ५० बेडचे हे कोविड केअर सेंटर सर्व सुविधायुक्त करण्यावर अधिक भर असून सर्व संबंधितांनी सेंटरच्या उभारणीचे काम अधिक गतीने करावे,’ अशी सूचना आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केली. नगरसेवक प्रतापसिंह जाधव यांच्या… Continue reading दुधाळी पॅव्हेलियन येथे ५० बेडचे कोविड सेंटर : आयुक्त

स्वच्छता अभियानातून ‘ही’ ठिकाणे स्वच्छ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आज (रविवार) पंचगंगा नदी घाट, रंकाळा तलाव परिसरासह अन्य ५ ठिकाणी श्रमदान आणि लोकसहभागातून स्वच्छता मोहिमेतून परिसर स्वच्छ केला. आजच्या स्वच्छता मोहिमेव्दारे शहरातील रिलायन्स मॉल मागील परिसर, खानविलकर पेट्रोल पंप ते भगवा चौक, पंचगंगा नदी घाट परिसर, इंदिरा सागर हॉल ते आयसोलेशन हॉस्पिटल, रंकाळा तलाव परिसर व शाहू स्मृती… Continue reading स्वच्छता अभियानातून ‘ही’ ठिकाणे स्वच्छ

error: Content is protected !!