साळवण (संभाजी सुतार) : कोरोनाचा संसर्ग शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे भागातील शेतकऱ्यांचा विचार करून तालुक्यातील निवडे येथील महालक्ष्मी विकास सेवा संस्थेमार्फत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक ए. डी. माने यांना भेटून शेतकऱ्यांसाठी बँकेमार्फत कोविड सेंटर उभे करावे, किंवा बँकेमार्फत प्रत्येक तालुक्याला व्हेंटिलेटर बेड द्यावेत, असे संस्थेचे व्हाईस चेअरमन ताजुद्दीन तरटे यांनी निवेदन दिले.

संस्थेचे संस्थापक चेअरमन निलेश म्हाळूंगेकर काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नसल्याने संस्थेचे व्हाईस चेअरमन ताजुद्दीन तरटे यांनी निवेदन दिले. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची बँक म्हणजे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक नेहमीच शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाते. या महामारीत कोल्हापूर जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना मदत करण्याची अपेक्षा शेतकरी करत आहेत. यावेळी उपस्थित संचालक सुजित खोराटे, आनंदा पाटील, शिवाजी राऊत आणि महाविर हांडे उपस्थित होते.