कोल्हापूर (प्रतिनिधी) : कुरुंदवाड नगरपरिषदेने विना मास्क फिरणाऱ्या ५२ जणांकडून ८ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. आजअखेर विना मास्क फिरणाऱ्या १७७६ व्यक्तींकडून १ लाख ५१ हजार ६०० रुपये दंडाची वसुली करण्यात आली आहे.

जयसिंगपूर नगरपरिषदेने विना मास्क फिरणाऱ्या १२ जणांकडून २ हजार ३७० रुपयांचा दंड वसूल केला आहे. आजअखेर १३१६ व्यक्तींकडून १ लाख ३६ हजार १८० रुपये दंडाची वसुली केली आहे.