कोल्हापूर (प्रतिनिधी) : तामगांव येथील वेदांत टूल्स प्रा. लिमिटेडच्यावतीने सामाजिक बांधिलकी म्हणून ६ हजार एन-९५ मास्क, ४ हजार ८०० हातमोजे आणि १०० पीपीई किट असे कोविड-१९ सुरक्षा साहित्य आज (बुधवार) महापालिका आयुक्त डॉ. मलिलनाथ कलशेट्टी यांच्याकडे सुपूर्द केले.

तामगांव येथील वेदांत टूल्स प्रा.लिमिटेडचे मॅनेजिक डायरेक्टर दत्तात्रय देसाई यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्यावतीने कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेसाठी सामाजिक बांधिलकी जोपासून मास्क, हातमोज आणि पीपीई किट हे साहित्य दिले आहे. यावेळी वेदांत टूल्स प्रा. लिमिटेडचे अन्य अधिकारीही उपस्थित होते.