कोल्हापूर (प्रतिनिधी) : श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय आणि रिर्सच सेंटरशी संलग्न संस्था आहे. चिकित्सालयातर्फे कोरोना महामारीच्या सुरवातीच्या काळात माधव रसायन आणि रस माधव वटीच्या निर्मिती प्रक्रियेस सुरवात केली.

सद्गुरू आनंदनाथ महाराजांच्या संकल्पनेतून आणि वैद्य समीर जमदग्नी यांच्या मार्गदर्शनातून श्री विश्ववती आयुर्वेद चिकित्सालय व संशोधन केंद्र, कोल्हापुरात ही वटीच्या निर्मितीची सुरवात झाली. या दोन्ही औषधांना महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने मान्यता व नोंदणी परवाना प्रमाणपत्र दिले आहे . या औषधांतील आयुर्वेद घटक औषधांची निवड करताना मानवी शरीरात विषाणू किंवा जीवाणू शिरकावास विरोध करणारी, रक्तातील प्रतिरोधक पेशी उत्तम ठेवणारी यंत्रणा म्हणजेच यकृत, पानथरी व अंतस्त्रांवांना सुव्यवस्थित ठेवणारी औषधे , विषाणूमुळे उत्पन्न होणारे इतर दुष्परिणाम कमी करू शकणारी औषधे तसेच निरोगी शरीर किंवा बाधित रुग्णांच्या शरीराची ताकद वाढविणाऱ्या आयुर्वेदातील रसायन प्रकारातील औषधांचा विचार केला आहे. दोन्ही औषधांतील नैसर्गिक स्निग्ध घटक पचन संस्था, श्वसन मार्गातील कोरडेपणा कमी करून पोट फुगणे तसेच छातीतील दाब वाढणे, कोरडा खोकला कमी करून त्वरित आराम देतात. माधव रसायन हे विषाणू संसर्ग जन्य ताप सर्दी, खोकला, श्वास, अंगदुखी या लक्षणांत उपयुक्त ठरते.

या औषधांनी रक्त पातळ ठेवण्याची प्रक्रिया सुरळीत होऊन रक्तातील गुठळ्यांची निर्मिती थांबते व रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. जुलै २०२० पासून राज्यात जवळपास एक लाख ७० हजार कोरोना वॉरियर्सना रस माधव वटीचे वाटप केले आहे.