महापालिकेतर्फे कळंबा फिल्टर हाऊस परिसरात जनजागृती रॅली

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या वतीने ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ मोहिमेतंर्गत कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी आज (मंगळवार) कळंबा फिल्टर हाऊस परिसरात जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये मास्क लावा, सामाजिक अंतर पाळा, वारंवार साबणाने हात धुवा, रस्त्यावर थुंकू नये, कोरोनाची लक्षणे दिसताच तपासणी करून घ्या तसेच स्वच्छता राखा अशा घोषणा देत नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले.… Continue reading महापालिकेतर्फे कळंबा फिल्टर हाऊस परिसरात जनजागृती रॅली

धक्कादायक ! कोरोना चाचणीसाठी लाखो सदोष आरटी पीसीआर किट्स वितरित

मुंबई (प्रतिनिधी) : राज्य सरकारला कोरोना साथीच्या संकटाला चांगल्या पद्धतीने प्रतिकार करता न आल्याची टीका विरोधी पक्षासह विविध स्तरातून होत आहे. यालाच एका अर्थाने आरोग्यमंत्री राजेश टोपे पुष्टी दिली आहे. राज्यात कोरोनाच्या चाचणीसाठी सदोष आरटी पीसीआर किट्स वितरित झाल्या आहेत. सरकारने जीसीसी बायोटेक कंपनीकडून खरेदी केलेल्या १२ लाख ५० हजार किट्स सदोष आढळून आल्याची कबुली… Continue reading धक्कादायक ! कोरोना चाचणीसाठी लाखो सदोष आरटी पीसीआर किट्स वितरित

कोरोनाबाबत दिलासादायक बातमी..!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात मागील काही महिन्यांपासून दररोज लाखांच्या संख्येनं वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मागील २४ तासांतील कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी प्रसिद्ध केली असून, दीड महिन्यानंतर रुग्णसंख्येची नीचांकी नोंद झाली आहे. एकूण रुग्णसंख्या ७१ लाख ७५ हजार ८८१ वर पोहोचली असली, तरी प्रत्यक्षात ६२ लाख २७ हजार… Continue reading कोरोनाबाबत दिलासादायक बातमी..!

कोल्हापूर जिल्ह्यात चोवीस तासात केवळ ७३ जण कोरोनाबाधित : ३८३ जण कोरोनामुक्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (सोमवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात केवळ ७३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात ३८३ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ६७४ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज रात्री ८ वा. प्राप्त… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यात चोवीस तासात केवळ ७३ जण कोरोनाबाधित : ३८३ जण कोरोनामुक्त

टोप येथे रक्तदान शिबिर संपन्न…

टोप (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तांचा पुरवठा कमी असल्याने टोप येथे ग्रामस्थांकडून रक्तदान शिबिर आज (सोमवार) आयोजित केले होता. यामध्ये ५० लोकांनी रक्तदान करुन सामाजिक कार्यासाठी हातभार लावला. हे शिबीर सीपीआरतर्फे आयोजित करण्यात आले होते. यावेळी रोजालिना गाँडद, स्मिता पाटील, डॉ. सुप्रिया लोखंडे, सुवर्णसिह चव्हाण, रुबीरा मसलत, जयवंत कदम, दिलिप गुरव, अमित पाटील, दौलत पाटील,… Continue reading टोप येथे रक्तदान शिबिर संपन्न…

जिल्ह्यात कोरोनाचे दीड हजारांवर बळी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरानामुळे शहर आणि जिल्हयातील रुग्णांच्या मृत्यूचा आकडा आतापर्यंत तब्बल दीड हजारांवर गेला आहे. यामध्ये दररोज भर पडतच आहे. सध्या काही प्रमाणात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाले, तरी धोका कायम आहे. प्रतिबंधात्मक लस नसल्याने कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू शकते, अशी शक्यता आरोग्य प्रशासनाने व्यक्त केली आहे. कोल्हापूर शहरात मार्चमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण… Continue reading जिल्ह्यात कोरोनाचे दीड हजारांवर बळी

कोल्हापूर जिल्ह्यात चोवीस तासात १०९ जण कोरोनाबाधित :  दिवसभरात ९९५ कोरोनामुक्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (रविवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात १०९ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात तब्बल ९९५ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ७३१ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज रात्री ८ वा.… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यात चोवीस तासात १०९ जण कोरोनाबाधित :  दिवसभरात ९९५ कोरोनामुक्त

शिरोली दुमाला येथे वाफेचे मशीन, मास्कचे वाटप…

सावरवाडी (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला येथे  कै.सुमन चव्हाण यांच्या स्मरणार्थ  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाफेचे मशीन आणि मास्कचे वाटप गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. गावातील घाटगे परिवाराने गावातील आशा सेविका, ग्रामस्थ यांना वाफेचे मशीन व मास्कचे वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला. तसेच मातोश्री वृद्धाश्रमातील लोकांना धान्य वाटपही करण्यात येणार… Continue reading शिरोली दुमाला येथे वाफेचे मशीन, मास्कचे वाटप…

चेन्नईतील दोन ऑक्सिजन टॅंक्स कोल्हापूरात दाखल…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाबाधित रूग्णांना आवश्यकतेनुसार ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत चेन्नई येथून ६ हजार लिटर क्षमतेचे दोन ऑक्सिजन साठवणूक टँक्स मागविलेल्या होत्या. जिल्हाधिकारी दौलत देसाई, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांच्या पाठपुराव्यामुळे टँक्स वेळेत दाखल झाले. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, मोटर वाहन निरीक्षक युनुस सय्यद संजय पाटील, सहाय्यक मोटार वाहन… Continue reading चेन्नईतील दोन ऑक्सिजन टॅंक्स कोल्हापूरात दाखल…

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात १९० जण कोरोनाबाधित :  दिवसभरात ९६४ कोरोनामुक्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (बुधवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात १९० जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात ९६४ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १२४४  जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज सायंकाळी ८ वा.प्राप्त झालेल्या… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात १९० जण कोरोनाबाधित :  दिवसभरात ९६४ कोरोनामुक्त

error: Content is protected !!