कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (रविवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात १०९ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात तब्बल ९९५ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ७३१ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज रात्री ८ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील २८, आजरा तालुक्यातील १, भूदरगड तालुक्यातील  ५, चंदगड तालुक्यातील ३, गडहिंग्लज तालुक्यातील ६, गगनबावडा तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील ७, कागल तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील १४, पन्हाळा तालुक्यातील १, राधानगरी तालुक्यातील १, शाहूवाडी तालुक्यातील ४,  शिरोळ तालुक्यातील ४,  इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील २२ आणि इतर जिल्ह्यातील ११ अशा एकूण १०९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ९९५ जण कोरोनामुक्त झालेतं.

दरम्यान, कोल्हापूर शहरातील २, शाहूवाडी तालुक्यातील २, करवीर तालुक्यातील १, भुदरगड १, सांगली जिल्ह्यातील २ आणि कर्नाटकातील निपाणी येथील १ अशा ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजअखेर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ४६,८०८.   

एकूण डिस्चार्ज ४०,७७१. 

उपचारासाठी दाखल रुग्ण ४४८७.

आजअखेर कोरोनामुळे एकूण मृत्यू १५५० झाले आहेत.