कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (बुधवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात १९० जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात ९६४ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १२४४ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
आज सायंकाळी ८ वा.प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील ६१, आजरा तालुक्यातील ६, भूदरगड तालुक्यातील २, चंदगड तालुक्यातील ५, गडहिंग्लज तालुक्यातील ६, हातकणंगले तालुक्यातील १३, कागल तालुक्यातील २, करवीर तालुक्यातील २३, पन्हाळा तालुक्यातील १३, राधानगरी तालुक्यातील १, शाहूवाडी तालुक्यातील ४, शिरोळ तालुक्यातील ८, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील २९ आणि इतर जिल्ह्यातील १७ अशा एकूण १९० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ९६४ जण कोरोनामुक्त झालेतं.
दरम्यान, करवीर तालुक्यातील २, हातकणंगले तालुक्यातील १, गडहिंग्लज १, शिरोळ १, कागल १ अशा ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आज अखेर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ४६,६९९.
एकूण डिस्चार्ज ३९७७६.
उपचारासाठी दाखल रुग्ण ५३८२.
एकूण मृत्यू १५४१.