सावरवाडी (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला येथे  कै.सुमन चव्हाण यांच्या स्मरणार्थ  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाफेचे मशीन आणि मास्कचे वाटप गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. गावातील घाटगे परिवाराने गावातील आशा सेविका, ग्रामस्थ यांना वाफेचे मशीन व मास्कचे वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला. तसेच मातोश्री वृद्धाश्रमातील लोकांना धान्य वाटपही करण्यात येणार आहे.  

यावेळी माधवराव घाटगे, माजी सरपंच नंदकुमार पाटील, एस.के.पाटील, माधव पाटील, राजीवजी सूतगिरणीचे संचालक बाजीराव पाटील, बलभीम विकास संस्थेचे अध्यक्ष  राहुल पाटील, विलास पाटील, अशोक पाटील, रावसाहेब घाटगे, पृथ्वीराज घाटगे, समीर पाटील, सचिन पाटील,  आशा गटप्रवर्तक संगीता पाटील, आशा सेविका, ग्रामस्थ, युवक उपस्थित होते.