कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (सोमवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात केवळ ७३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात ३८३ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ६७४ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
आज रात्री ८ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील २३, भूदरगड तालुक्यातील २, चंदगड तालुक्यातील ३, गडहिंग्लज तालुक्यातील २, हातकणंगले तालुक्यातील ८, कागल तालुक्यातील ४, करवीर तालुक्यातील ७, पन्हाळा तालुक्यातील ४, राधानगरी तालुक्यातील ४, शाहूवाडी तालुक्यातील १, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ५ आणि इतर जिल्ह्यातील १० अशा एकूण ७३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ३८३ जण कोरोनामुक्त झालेतं.
दरम्यान, कोल्हापूर शहरातील सुभाषनगर येथील १, संभाजीनगर येथील १, आजरा तालुक्यातील १, गगनबावडा तालुक्यातील १, सांगली जिल्ह्यातील १,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २ आणि सोलापूर जिल्ह्यातील १ अशा ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आजअखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४६८८१.
एकूण डिस्चार्ज ४११५४.
उपचारासाठी दाखल रुग्ण ४१६९.
कोरोनामुळे एकूण मृत्यू १५५८ झाले आहेत.