टोप (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तांचा पुरवठा कमी असल्याने टोप येथे ग्रामस्थांकडून रक्तदान शिबिर आज (सोमवार) आयोजित केले होता. यामध्ये ५० लोकांनी रक्तदान करुन सामाजिक कार्यासाठी हातभार लावला. हे शिबीर सीपीआरतर्फे आयोजित करण्यात आले होते.
यावेळी रोजालिना गाँडद, स्मिता पाटील, डॉ. सुप्रिया लोखंडे, सुवर्णसिह चव्हाण, रुबीरा मसलत, जयवंत कदम, दिलिप गुरव, अमित पाटील, दौलत पाटील, पांडूरंग बोगार्डे, संजय कोळी, योगेश भोसले उपस्थित होते.